स्वच्छ सुंदर व हरित प्रभागाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार

 स्वच्छ सुंदर व हरित प्रभागाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार 



 अविनाश घुले : कानडे मळा येथे मा.सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

अहिल्यानगर : प्रभाग क्रमांक ११ मध्ये नागरिकांच्या सहकार्यामुळे विकासाच्या योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. सतत जनतेच्या संपर्कात असल्यामुळे दैनंदिन मूलभूत प्रश्न तातडीने सोडविले जात असतात, त्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकासाचे कामे मार्गी लागत आहे. जमिनी अंतर्गतील ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याच्या लाईनची कामे मार्गी लागल्यानंतर रस्त्यांची कामे पूर्ण केली जात असल्यामुळे ती कामे पुन्हा-पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आमदार संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून प्रभागातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहे. स्वच्छ सुंदर व हरित प्रभागाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांनी केले

           कानडे मळा येथे मा.सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रामदास कानडे, मिलिंद कानडे, सोमनाथ हजारे, पोपट रासकर, कैलास कानडे, ज्ञानदेव मोरे, अंबादास लोंढे, बाबासाहेब सांगळे, नितीन डाडर अदिसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(चौकट) कानडे मळ्यातील माउंट लिटरा झी स्कूल कडे जाणारा रस्ता असून या ठिकाणी विद्यार्थी पालक वर्ग स्कूल बस ड्रायव्हर मोठ्या संख्येने येत असतात तसेच कानडे मळ्यातील नागरिकांच्या दळणवळणासाठी हा मुख्य रस्ता असून त्याचे काम स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांनी मंजूर करून दिला आहे. तसेच लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होऊन विद्यार्थी व नागरिकांसाठी दळणवळणासाठी खुला केला जाणार आहे अशी माहिती रामदास कानडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments