'जन पळभर म्हणतील टिंब टिंब' चे नेटकं सादरीकरण

नाट्यसमीक्षण 

'जन पळभर म्हणतील टिंब  टिंब' चे नेटकं सादरीकरण


नगर : 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेचा रंगमंचावरचा पडदा उघडताच काही लहान या मुली लंगडी खेळत असतात.   एक मुलगी बाजूला उभे राहून त्यांचा खेळ पाहत असते.   ती मुलगी विचारते माझ्या काकाला पाहिलंत  का ? तशा त्या लंगडी खेळणाऱ्या मुलीं नाही म्हणतात.ती मुलगी म्हणते मी आधी माझ्या काकाला शोधते, तसे त्या मुली होकार देऊन म्हणू लागतात की खूप दिवसात आपण काकांकडून गोष्ट ऐकली नाही,  ती मुलगी काकाला शोधून आणते.  तसेच सगळ्या मुली काकाला गोष्ट सांगण्याविषयी आग्रह धरू लागतात काका म्हणतो मी आज तुम्हाला शापित यक्षाची गोष्ट सांगतो अनाहूत असे त्या शापित यक्षाचे  नाव असते . अहंकाराने  जडलेल्या   या यक्षाला अर्धा यक्ष  आणि अर्धा पुरुष असा  जगण्याचा शाप असतो.  तो   जोपर्यंत एखाद्या अहंकार ग्रस्त माणसाचा अहंकार उतरवत नाही ,तोपर्यंत त्याला पूर्ण यक्ष योनी  प्राप्त होणार नाही असा त्याला  उशा:प  असतो .

गावातील नेता आत्माराम याला गावाचे भले केल्याबद्दल अहंकार असतो . त्याचा अहंकार उतरविण्यासाठी अनाहूत तेथे उपस्थित होतो.  गावात श्रीपती नावाच्या  एका माणसाचे निधन होते . त्यावेळी  होणाऱ्या संभाषणामध्ये  आत्माराम ला कुत्सित  हसण्याचा आवाज येतो.  आणि तो सारखा अरे प्रसंग कुठला आणि या प्रसंगात हसणं तुला शोभतं का असं बाबुराव वर खेसकत असतो, तर प्रत्येक वेळी बाबुराव मी कुठे हसलो ? असा प्रश्न विचारतो.  त्यानंतर अंत्यसंस्काराच्या दरम्यान आत्माराम आणि अनाहुतची भेट होते.  

आत्माराम मघास पासून हसणारा तो तूच का ? तुला माहिती आहे का?  मी कोण आहे? ती  समोर आहे ना ती शाळा मी उभी केली.  या गावात धरण बांधलं.  इस्पितळ उभं केलं . मंदिर बांधलं.  गावात माझ्या शब्दाला खूप मान आहे . गावाचं पान आहे माझ्याशिवाय हालत नाही., असे  सांगतो त्यावर  अनाहूत म्हणतो ,आत्माराम तू मेलास ना त्यानंतर सात दिवसात तुला हे सगळे विसरून जातील.  त्यावर आत्माराम अनाहुत मध्ये वाद होतो.    त्या वादाचे पर्यावसान   पैज लावण्यात होते.  आत्माराम अनाहूतला विचारतो तू पैज  हरलास तर काय देणार? अनाहूत  म्हणतो मी पैज हरणार नाही, तरीपण तू मागशील ते मी देणार आणि मी पण जिंकली तर?  आत्माराम म्हणतो मी तुझं डोकंच त्या समोरच्या दगडावर चार वेळा दणादण आपटणार असं  त्याला म्हणतो.  चल तर मग तयार हो तुझा मृत्यू बघण्यासाठी .

आत्माराम मरतो तसा त्याचा मुलगा बापाचे विधी करण्यासाठी मुंडन करण्यास नकार देतो . आत्मारामचा खंदा समर्थक बाबुराव हा पतंगराव नावाच्या नेत्याच्या मागेपुढे फिरताना आत्मारामला  दिसतो.  गावकरी आत्मारामचा  हाताची घडी तोंडावर बोट असलेला पुतळा गावात बसवतात.  त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गावाच्या सरपंचबाईच्या मदतीने मंत्र्याला  गावात आणून पुतळ्याच्या अनावरण करतात.  तिसऱ्या- चौथ्या दिवशीच पुतळ्याच्या ओट्यावर ग्रामस्थ बसून गप्पा मारत असतात.  तर पुतळ्याच्या मागे आत्मारामची मुलगी तिच्या प्रियकराला भेटायला जात असते . पुतळ्यावर धूळ बसते . कावळे पुतळ्यावर विष्ठा   करतात . ते पाहून आत्माराम ला खूप वाईट वाटते.  हे सगळे बघून आत्माराम हा अनाहूतला   म्हणतो की, मला आता पुन्हा जन्म नको मात्र अनाहूतला  आत्मारामचा  मीपणा कमी केल्याने,  आत्माराम अहंकारातून मुक्त होतो.  तसा अनाहुतही शापातून  मुक्त होतो.  एवढ्यात  आत्माराम ची बायको येते आणि आत्मारामला उठवते.  तोही झोपेतून खडबडून जागा झाल्यानंतर सारखा जागा होतो.असं  काहीसा अध्यात्मिक संदेश देणारं हे नाटक !

         अभय पैर  लिखित विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणने सादर केलेले   दोन अंकी नाटक 'जन पळभर म्हणतील टिंब टिंब 'हे नाटक आत्माराम बागडे यांनी दिग्दर्शित केले होते . स्टेजवर एक पुतळ्याचा चौथारा आणि दोन लेव्हल्स सोडल्यातर काही चौकटींचा वापर करून आत्माराम चे घर, पडवी हे दाखवण्यात आले . मोजक्या स्टेजमुळे प्रॉपर्टीमुळ पात्रांना  स्टेजवर मोकळेपणे वापरता आले.  काकाच्या भूमिकेतील विकास चव्हाण यांनी पद्यगायनाच्या  माध्यमातून कथानक पुढे नेले . त्यांचा स्टेजवरचा वावर हा लाल प्रकाश झोतात दाखवल्यामुळे विशेष उठून दिसला.  प्रहसनात्मक  प्रसंगातून कथानक पुढे जाताना साध्या प्रकाश योजनेतून प्रसंग उठावदार करण्याकडे प्रकाशयोजनाकार विनोद गरुड यांनी भर दिला.  आत्मारामच्या भूमिकेत वसंत नारद, अनाहूतच्या   भूमिकेत अक्षय केंद्रे यांनी आपापल्या भूमिका चांगल्या पेलल्या ,तर बाबुरावच्या भूमिकेत वैभव सोमासे आणि सरपंचबाईच्या भूमिकेतील ऐश्वर्या बंग यांनी त्यांच्या संवादफेकीतून प्रेक्षकांची दाद  वसूल केली. बेवड्याच्या भूमिकेतील राहुल राऊत यांनी संवादफेकीतून तसेच  विशेष लकबीतून   प्रेक्षकांची दाद  वसूल केली.  बाकी आत्मारामचा मुलगा ऋत्विक (कृष्णा नरोडे) मुलगी शकू (वैष्णवी काळे) हिराबाई (दिपाली निळे) बायजाअक्का  (संध्या तेलोरे) आदींनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या.  नाटकाच्या मध्यंतरापर्यंत हार्मोनियम आणि तबला, पखवाज आदीं वाद्यांजवळ माईक जवळ असल्याने स्टेजवरून गाणाऱ्या कलाकाराचे शब्द त्या घोंगाटात हरवले.  वास्तविक पाहता ज्या  पद्धतीने गायनातूनच कथानक पुढे सरकत होते ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाही.  एक दोन पात्रांचा आवाज प्रेक्षागारात नीट पोहोचू शकला नाही.  या तांत्रिक चुका सोडल्यास एकंदरीत प्रयोगाचे सादरीकरण ठीक होते.  ग्रामीण भागातील नाट्यसमूहाने केलेले सादरीकरण त्यामानाने कौतुकास्पद म्हणावे लागेल.

Post a Comment

0 Comments