दैनिक नगर स्वतंत्र, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना करणार 100 टक्के मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींचा गौरव

 दैनिक नगर स्वतंत्र, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना करणार 100 टक्के मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींचा गौरव

अहिल्यानगर - जिल्ह्यात विधानसभा मतदार संघात गुरुवारी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ज्या ग्रामपंचायतीमध्ये 100 टक्के मतदान होईल त्या ग्रामपंचायतींचा दैनिक नगर स्वतंत्र, डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना गौरव करणार आहे.

 जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान होणार्‍या ग्रामपंचायतीला 1 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे यांनी दिली.

  जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात अकोले, कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी-नगर, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड, पारनेर-नगर, श्रीगोंदा-नगर या विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के मतदान होईल त्या ग्रामपंचायतीला एक हजार रुपयाचे रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे.

विवाहात कन्यादान, एखाद्या जीव वाचविण्यासाठी रक्तदान, गावाचा विकास करण्यासाठी श्रमदान आणि गुरुवारी दि. 20 नोंव्हबर रोजी मतदानाचा हक्क मतदारांनी बजवावा असे आवाहन दैनिक स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ यांनी केले आहे.

शंभर टक्के मतदान होणार्‍या ग्रामपंचायतीचा गौरव जिल्हाधिकारी सिद्घीराम सालीमठ,  उप जिल्हानिवडणूक अधिकारी राहुल पाटील, डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, सचिव महेश कुगावकर यांच्या उपस्थित होणार असल्याचे चिंधे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments