दत्तक प्रक्रियेच्या जागृती बाबत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची गरज : न्या. भाग्यश्री पाटील

  दत्तक प्रक्रियेच्या जागृती बाबत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची गरज :  न्या. भाग्यश्री पाटील 


नगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, CSA संस्था आणि शिशुगृह अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या प्रसंगी बोलताना काळजी व संरक्षण याची गरज असलेल्या बालकांना प्रतिपालक प्रक्रियेत आणून त्यांना हक्काचे घर आपण देऊन अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी सर्व संस्थानी प्रयत्न करावेत तसेच बालकांच्या हक्कासाठी कोणत्याही प्रकराची मदत लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असल्याचे आव्हान न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी  केले.

 तसेच न्यायाधीश निर्मले यांनी देखील दत्तक पालक असल्याचा अनुभव सर्वांसोबत व्यक्त केला. तसेच मा. बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड  जयंत ओहोळ यांनी दत्तक प्रक्रिया व प्रतिपालकत्व याची गरज ओळखून सर्व सर्व प्रशिक्षणार्थीनां शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत बाल कल्याण  समिती सदस्य अँड. अनुराधा येवले व तुषार कवडे यांनीही सर्वाना शुभेच्छा दिल्या.

       एकदिवसीय कार्यशाळेत प्रतिपालकत्व व दत्तक जाणीव जागृती महिना साजरा करण्यात आला. 


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा. वैभव देशमुख यांनी केले. कार्यशाळेचे मार्गदर्शक हे WIC चे सहदेव कांबळे व शिशुगृहाचे  मॅनेजर शीतल प्रभुणे हे होते. त्यांनी दत्तक प्रक्रिया व संस्थांचा सहभाग यावर मार्गदर्शन केले.

     सदर कार्यशाळेस जिल्यातील सर्व संस्था उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य आंधळे यांनी केले व आभार प्रदर्शन जुई जावरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments