लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दीपोत्सव थाटात संपन्न
अहिल्यानगर : येथील लाड सुवर्णकार समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालाबाद प्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी समाजातील बंधू-भगिनी व परिसरातील हरी ॐ भजनी मंडळातील भगिनीनी कोजागिरी पौर्णिमेपासून दररोज पहाटे विठ्ठल रुक्मिणी नरहरी महाराज, लक्ष्मीनारायण श्री स्वामी समर्थ मूर्तीस पहाटेच काकड आरती, पूजाअर्चा, भजन, रोज नित्यनियमाने होते .
हरीॐ भजनी मंडळातील भगिनी सौ.छाया लखारा, सौ.सुनिता कुलट,मंगल डागवाले, सगिता बेरड,सुमन मोकाटे,सिंधू सुडके ,शालिनी राठौर,लिलाव शहरकर,वंदना शहरकर, वनिता शहरकर, सुशीला रत्नापूरकर, दिपाली लखारा यानी अत्यंत मनमोहक आकषॅक रेखीव रांगोळी काढली.
याप्रसंगी अध्यक्ष संजय देवळालीकर, मुकुंद निफाडकर, शरद कुलथे,किशोर शहरकर, व समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून दीपोत्सवाची शोभा वाढवली.
0 Comments