जातीच्या आधारावर राज्य निर्मितीला मौलाना आझादांनीच विरोध केला होता
प्रा.डॉ.अब्दुस सलाम : मौलाना आझाद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
मौलाना हे जाणून होते की, या देशात धर्माच्या आधारावर राज्य निर्माण झाल्यास आराजकता वाढेल व दोन समाजात अगोदरच फाळणीमुळे दरी वाढलेली होती, त्यात अजून भर पडली असती, असे मौलानांना वाटत होते. त्यामुळेच जाती वर आधारीत राज्यची निर्मिती न होता; ती भाषावार झाली, असे मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर यांनी मौलाना आझाद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले.
मखदूम सोसायटीच्यावतीने मौलाना आजाद यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त आयोजित कौमी एकता सप्ताह मध्ये दुसरे व्याख्यानमाला आलमगीर येथील मातोश्री उर्दू हायस्कूल व अलहाज शेख अब्दुल अजीज ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् मध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, मुख्याध्यापक जमीर शेख, प्रा डॉ. एजाज शेख, आफरीन शेख, नसरीन तांबोली, मुज्जंमील शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments