चित्रातून बोलणारी पुस्तके उद्याची आदर्श पिढी घडवतील - साहित्यिका डॉ. लीलाताई गोविलकर

 चित्रातून बोलणारी पुस्तके उद्याची आदर्श पिढी घडवतील - साहित्यिका डॉ. लीलाताई गोविलकर


 "बालक दिनी"सावेडी जिल्हा वाचनालयात महिला मंडळ बालक मंदिरच्या बालकांचा" पुस्तकोउत्सव "

    नगर - माणसे ,लेखक, साहित्यिक हे येतील ,जातील परंतु पुस्तके ही सतत आपल्याशी बोलतात, शिकवतात, संवेदनशील बनवतात .आज बालदिनी महिला मंडळ बालक मंदिरच्या बालकांच्या हाती पडलेली पुस्तके व त्यातून डोकावणारी चित्रे भविष्यात आदर्श पिढी घडवतील.जिल्हा वाचनालयाने सुरू ठेवलेला हा वाचन संस्कृतीचा वारसा वाचन चळवळीस प्रेरक असल्याचे उदगार ज्येष्ठ साहित्यिका व अभ्यासक डॉक्टर नीलाताई गोविलकर यांनी काढले. 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बाल दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या सावेडी शाखेत आयोजित कार्यक्रमास त्या, बालकांशी संवाद साधताना बोलत होत्या.

या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक, उपक्रमाच्या प्रमुख संचालिका प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी, महिला मंडळाच्या संचालिका सौ ज्योती केसकर, सौ मीनल गंधे, मुख्याध्यापिका अस्मिता शूळ,ग्रंथपाल अमोल इथापे, समन्वय सौ सारिका देव यांच्यासह महिला मंडळ बालक मंदिराच्या शिक्षक वर्ग उपस्थित होता. 

प्राध्यापक मोडक यांनी प्रास्ताविकात "आपल्या जीवनात चांगले आदर्श असतील तर आपले आयुष्यही चांगले घडते. पुस्तकांच्या सानीध्यातून तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असल्याने त्याची सवय आतापासूनच अंगी बानवावा असा आशावाद व्यक्त करून सावेडी वाचनालयात लवकरच उद्योजक किशोर नेवासकर यांच्या सहकार्यातून सुसज्ज बाल वाचनालय विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सौ. ज्योती कुलकर्णी यांनी याप्रसंगी संवाद साधताना "उगवत्या पिढीमध्ये वाचनाचा वारसा वृद्धिंगत व्हावा असे पंडित नेहरूंचे स्वप्न होते. आज बालकांच्या हाती पडलेली पुस्तके हे त्याचेच प्रतीक आहे .यापुढेही जिल्हा वाचनालय बालकांसाठी मोफत सभासदत्व देणार असल्याचे सांगितले.

 याप्रसंगी महिला मंडळ बालक मंदिरच्या सर्व शिक्षक वृंदांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. बालकांना सावेडी वाचनाच्यावतीने गोष्टीची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच सौ मीनल गंधे यांच्या वतीने अल्पोपार देण्यात आला. आभार महिला मंडळाच्या संचालिका  ज्योती केसकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ सारिका देव ,पौर्णिमा गायकवाड ,साक्षी पद्मा, दिपाली कल्याणम यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. 

Post a Comment

0 Comments