लबाडी करून,गोडगोड बोलून सारख-सारखं यश मिळत नाही

 लबाडी करून,गोडगोड बोलून सारख-सारखं यश मिळत नाही

शिवाजीराव कर्डिलेंचा तनपुरेंना टोला: नगर तालुक्यातील डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारै यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नगर : मी 1995 ला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून जनता दरबार घेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. समोरचा व्यक्ती कोण आहे हे  न पाहता मी त्याचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने मला लबाडी करता येत नाही. म्हणूनच मला जनतेने पाच वेळा विधानसभेत पाठवले. जे लबाडी करून, गोडगोड बोलताना त्यांना जनता लवकरच कंटाळते. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आताच्या लोकप्रतिनिधीने अशीच लबाडी केली व आज जनताच त्यांना पाडण्यासाठी आतूर झाली आहे. निवडणुक जाहीर झाल्यापासून गावागावतील शेकडो तरूण रोज माझ्याकडे येवून भाजपत प्रवेश करीत आहेत. कारण त्यांचा विद्यमान लोकप्रतिनिधीकडून विकासकामांच्याबाबतीत भ्रमनिरास झाला आहे. यावेळी मला राहुरी तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळणारच आहे. त्याबरोबरच आपल्या हक्काच्या नगर  तालुक्यानेही भक्कम साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत नगर तालुक्यातील डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारे यांच्यासह डोंगरगण, पिंपळगाव माळवी, गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून यंदा मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राजू शेटे, बाजीराव भुतकर, मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम, राजेंद्र दारकुंडे, कैलास पटारे, बबनराव पटारे, सदाशिव पवार ,शिवाजी साठे, महेश भरडिया, अर्जुन कदम, बाळासाहेब वाघ, बापू तागड, सागर कदम, अशोक मते, कांताबाई भुतकर, आशाबाई कदम, सोपान मते, भाऊ कदम, जयराम कदम, इंद्रभान कदम, एकनाथ गुंड, बापू बेरड, संतोष झिने, वसंत शिंदे, श्रीकांत साठे, सुभाष आढाव, बाजीराव कराळे, अजिंक्य नागवडे, मेजर गुंड आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्डिले पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना मतदारांनी गावोगावी अक्षरशा नाकारले आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, युवक,महिला, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना फोन करून दम देत दहशत निर्माण करत आहेत.

 मागील वेळी 2019 ला लोकांनी भावनिक होवून  आपल्या विरोधात मतदान केले. परंतु आता पाच वर्षांनी आपल्या मतदारसंघाचा किती तोटा झाला हे सगळ्यांना कळले आहे.

 विकासाचा हा अनुशेष भरून काढायचा एवढाच विचार करून मी यावेळी निवडणुकीला उभा राहिलो आहे. मी गरीबीतून वर आलेलो आहे. त्यामुळे कोणाला कधीही दुखावण्याचा माझा स्वभाव नाही.

Post a Comment

0 Comments