निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार

 निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार 


 माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले : राहुरी शहरात कर्डीले यांची अभूतपूर्व प्रचार फेरी, चौकाचौकात पुष्पवृष्टी करून स्वागत.

राहुरी : राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाईने अभूतपूर्व स्वागत करून निकाल काय असते हे दाखवून दिले आहे. राहुरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याच्या निकालानंतर आमदार होताच मी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू करेल. मागासवर्गीयांना हक्काचे घरकुल मिळवून देईल. सध्या समोरच्या लोकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे. आमच्यावर दहशतीचे आरोप केले जात आहे. हे करताना हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींना, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. वास्तविक यांना आता हिंदू म्हणून घेण्याची भीती वाटते, त्यांना वाटते इतर लोकांची मते मिळणार नाहीत. ते स्वतःच कपडे फाडून घेत आमच्या लोकांवर आरोप करीत आहेत. राहुरी कोणाच्या दहशतीखाली आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे राहुरी खऱ्या अर्थाने दहशतमुक्त होण्याचे काम माझ्या विजयाने २३ तारखेला होणार आहे, असा विश्वास राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला.

बुधवारी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात अभूतपूर्व प्रचार फेरी काढून इतिहासातील मोठं शक्तिप्रदर्शन केले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,  उदयसिंह पाटील, तालुका अध्यक्ष सुरेश बानकर,  राजू शेटे, भास्कर गाडे,  दादासाहेब सोनवणे, सुरेंद्र थोरात, शिवाजी सागर, आर.आर.तनपुरे, भैय्या शेळके, अक्षय तनपुरे, दिनेश जठार, देवेंद्र लांडे, सुजय काळे, गणेश खैरे, सचिन मेहत्रे, अरुण डौले, शिवाजी डौले, उमेश शेळके, जीशान शेख, मीराताई घाडगे, अरुण साळवे,  स्नेहा साळवे, कांतीलाल जगधने, आबासाहेब डौले, नयन शिंदे आदी उपस्थित होते.

       माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले,  यापूर्वी शहरात मला कधीही 25 लोकांच्या पुढे मिरवणूक काढता आली नाही. या मिरवणुकीमध्ये हजारो मतदार सहभागी झाले आहेत.  तनपुरे यांच्या दादागिरीचा पोलखोल विजयी रॅलीत करणार आहे.‌  आता निवडणूक संपल्यानंतर नगरपालिकेमध्ये सत्ता आणायची आणि विकास काय असतो हे राहुरी शहराला दाखवून देऊ. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,  आरोग्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न प्रलंबित आहे. मी मंजूर केलेले काम देखील यांनी होऊन दिली नाही. शहरात घरकुल योजना राबवू. आपला विजय अटळ आहे.

सत्यजित कदम म्हणाले, नगरविकास राज्यमंत्री असलेल्या लोकप्रतिनिधीच्या शहरात आज ठिकठिकाणी गटारीचा वास आहे. सर्वत्र बकाल व भकास परिस्थिती आहे. विकास शहरात कुठेच दिसत नाही. आणि यांना परत आमदारकी पाहिजे. जनता मतदानाचा त्सुनामी कर्डिले यांच्या पारड्यात टाकेल ही काळ्या दगडावरची रेष आहे.

अक्षय कर्डिले यांनी दंड थोपटले तर ते घाबरले

राहुरी तालुक्यातील प्रचारात युवा नेते अक्षय कर्डिले यांनी विकासाच्या दृष्टीने दंड थोपटले तर त्यांना पोटशूळ उठला खरे तर आम्ही पैलवान मंडळी आहोत. कोणतंही मैदान असलं तरी दंड थोपटू शकतो. आता त्यांना दंडही थोपटता येत नाही आणि जोर बैठकाही मारता येत नाही यात आमचा काय दोष असा टोला कर्डीले यांनी तनपुरे यांना नाव न घेता लगावला.

Post a Comment

0 Comments