सूर बतियाँ ने अहिल्यानगरचे संगीतरसिक हरपून गेले.

 सूर बतियाँ ने अहिल्यानगरचे संगीतरसिक हरपून गेले



नगर : संगीतक्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणात संगीताचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे त्यांना सुयोग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने आयोजित केलेला "सूर बतियाँ " हा एक उद्बोधक असा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच माऊली सभागृहात संपन्न झाला.

        गुरूमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत अभ्यासक आणि सुप्रसिद्ध गायिका सायली पानसे लिखित 'गंधार' या पुस्तकावर आधारित शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत अशा विविध गीतप्रकारांवर संगीत विषयक सविस्तर माहिती, गप्पा आणि संगीताच्या माध्यमातून नाट्य रूपात संवाद साधत प्रात्यक्षिकांसह स्वतः सायली पानसे यांच्या बरोबर, ज्येष्ठ गायक पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य मेहेर परळीकर , प्राजक्ता मराठे यांची शिष्या अनुष्का आपटे यांनी उत्तम गायन केले , यांना तबल्यावर साथ देणारे अभिजित बारटक्के व हार्मोनियम  वर निलय सालवी यांनी सुरेल साथ संगत केली व सूर बतियाँ हा अनोखा कार्यक्रम सादर केला.  या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना, संहिता लेखन स्वतः सायली पानसे यांचे होते. संगीत साधक आणि संगीत शिक्षकांसाठी ही खास पर्वणीच होती विशेष करून गाणाऱ्या व संगीत शिकणाऱ्या कलाकारांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणी .

      रागदारी म्हणजे काय?, राग म्हणजे काय?, ठेका म्हणजे काय? लय म्हणजे काय? असे सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न अतिशय साध्या ,सोप्या भाषेत अलगदपणे उलगडत, उपस्थित रसिकांना सामावून घेत  सादर केलेल्या या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातील बरेच बारकावे  संगीतरसिकांना शिकायला मिळाले.  या कार्यक्रमात वेगवेगळ्या अवघड तालांमध्ये निबद्ध असलेल्या बंदिशी स्वतः सायली पानसे यांनी रचलेल्या या रचनांची  संगीत मेजवानीच प्रेक्षकांना मिळाली .

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई चे रजिस्ट्रार मा. श्री. विश्वासजी जाधव,ज्येष्ठ संगीत गुरुवर्या श्रीमती कुमुदिनी बोपर्डीकर, संगीतकार व गायक डॉ. श्री. निरजजी करंदीकर, सुरतहून  खास ह्या कार्यक्रमासाठी आलेले संगीत शिक्षक प्रा.श्री.तानाजी जाधव, ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कॉलेजचे  संगीत विभाग प्रमुख प्रा.श्री. निलेश खळीकर यांचे सह सुफी संगीततज्ञ श्री. पवनजी नाईक, विलास बडवे श्री अशोक गांधी (जरिवाला) आणि गुरूमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ.वर्षा पंडित व चंद्रकांत पंडित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री नटराज पूजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर  मान्यवरांनी आपले  मनोगत व्यक्त केले.

       या कार्यक्रमाचे कौतुक करतांना, पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा  प्रचार आणि प्रसार करण्याचे काम  या अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे हा  कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावा  असे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे  रजिस्ट्रार मा.श्री विश्वासराव जाधव यांनी व्यक्त केले.

       श्री निलेश खळीकर यांनी एका कवितेतील काही ओळी सादर केल्या व त्यानंतर त्यांनी  मी माझ्या गुरूकडून जे जे शिकलो त्याची आज उजळणी झाल्याची अनुभूती सूर बतियाँ मुळे मला मिळाली व शास्त्रीय संगीत म्हणजे नक्की काय आहे तसेच संगीताचे अनेक पैलू आज विद्यार्थ्यांना समजले असतील असे प्रतिपादन केले व सूर बतियाँच्या  संपूर्ण टीम चे अभिनंदन केले.

 तर डॉ नीरज करंदीकर यांनी  इंटेलिजन्स, नॉलेज आणि विस्डम  याचा  त्रिवेणी  संगम आज  अनुभवायला मिळाला  व  शास्त्रीय संगीतातील कंपोझिशन्सच इतकं छान ॲप्लिकेशन  करणं यासाठी दैवी देणगी व कलाकाराची अशी प्रतिभा असावी लागते असे आपल्या मनोगतात व्यक्त  केले.   तर  तानाजी जाधव यांनी सायलीताईंच्या  बंदिशींचे मनापासून खूप कौतुक करत भविष्यात या बंदिशींचा विद्यार्थ्यांना शिकवतांना खूप उपयोग होईल असेही सांगितले      श्रीमती कुमुदिनी बोपर्डीकर यांनी  सायली पानसे यांचा सूर बतियाँ हा कार्यक्रम म्हणजे  नवीन पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे अश्या भावना व्यक्त केल्या. सर्व मान्यवरांनी या अनोख्या आणि दर्जेदार  कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल गुरुमाऊली संगीत विदयालयाचे श्री चंद्रकांत पंडित व सौ वर्षा पंडित या दाम्पत्याचे  धन्यवाद देऊन अभिनंदन केले. आणि  या कार्यक्रमाचे नगरला पुन्हा आयोजन करावे असे सुचवले.या कार्यक्रमास आनंद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत नेटके  सूत्र संचालन केले.  सभागृहाचे प्रवेशद्वारी श्री दिनेश मंजतरकर यांनी सुरेख रांगोळी रेखाटली .

सूर बतियाँ च्या सर्वेसर्वा सायली पानसे यांनी नगरच्या दर्दी आणि सुजाण प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर करतांना खूप आनंद झाला असे सांगितले तसेच उत्कृष्ट आयोजन व नियोजन केल्याबद्दल श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या श्री. चंद्रकांत पंडित व सौ.वर्षा पंडित यांचे भरभरून कौतुक केले.

      कार्यक्रमास नगरमधील अनेक मान्यवर संगीत रसिक उपस्थित होते धनेशजी बोगावत, विलास बडवे, अशोक गुर्जर, विवेक धर्म, अजय बोरा, लेप्ट. कर्नल माणिक त्रेहान, पल्लवी जोशी, स्मिता केतकर, डॉ दीपा मोहोळे, डॉ प्राची पाटील, शुभा बोगावत, डॉ दिप्ती करंदीकर, डॉ राहूल पंडित, संदीप महाजन, श्री व सौ अपस्तंभ,  प्रा. शरद गोखले, शरद देशपांडे, अमोल बास्कर, संजय हिंगणे, नितीन थाडे,  ऋतुजा पाठक, अमृता बेडेकर डॉ. योगिनी वाळिंबे. महेश लेले , आनंद ऋषी , सुरेखा डावरे अजित वधवा अशा संगीत रसिकांसह सप्तसूर ग्रुप तसेच अनेक संगीत विद्यालयांचे संचालक तसेच  माऊली सभागृहाचे श्री दिनकरराव घोडके आणि पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments