आदिवासी भागात विकास योजना आणण्याचे काम प्रामाणिकपणे केले
शिवाजीराव कर्डिले : भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा वावरथ जांभळी परिसरातील गावांमध्ये प्रचार दौरा, ग्रामस्थांनी केले पुष्पवृष्टी करून स्वागत
राहुरी: वावरथ जांभळी परिसरातील नागरिकांची दळणवळण यांची सोय व्हावी यासाठी पुलाचा प्रलंबित प्रश्न आमदार होताच प्राधान्याने मार्गी लावण्याचे काम करणार आहे. या भागातील नागरिकांचा राहुरीशी संपर्क होण्यासाठी स्वखर्चातून दळणवळणासाठी बोट उपलब्ध करून दिली . त्यानंतर प्रशासनाकडे पाठपुरावा करत 25 लाखांची अत्याधुनिक बोट देण्याचे काम केले. 2019 ला आमदार न झाल्यामुळे विकासाची कामे होऊ शकली नाहीत. आदिवासी, धनगर समाज तांडा, वस्त्यांवर राहत असून त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम केले आहे. भावनेचे राजकारण संपले असून आता अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला विकासाची कामे मार्गी लावायचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी, जांबुळबन, शेरी चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, दरडगावथडी, गाडकवाडी, ताहराबाद, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे आदी गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी कर्डिले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेरी चिखलठाणा ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना विधानसभा निवडणूक खर्च म्हणून 21 हजार रुपयांची आर्थिकत देणगी देण्यात आली. म्हैसगाव येथील नागरिकांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली व कर्डिले यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.
या प्रचार दौऱ्यात देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अध्यक्ष सत्यजित कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, अण्णासाहेब बाचकर, अविनाश बाचकर, दादा पाटील बाचकर, शिवाजी सागर, गोपीनाथ दुधाडे, पांडुरंग शेलार, भीमराव काकडे, बाळासाहेब काकडे, सारंग काकडे, अरुण पवार, दत्तात्रय काकडे, बापू जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवाजीराव कर्डिले पुढे म्हणाले,जांभूळबन, जांभळी वावरथ या आदिवासी गावांमध्ये कधीही आमदार, खासदार, मंत्री, प्रशासन आले नव्हते. मात्र मी 2009 मध्ये आमदार झालो आणि या भागाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत या गावकऱ्यांची ऋणानुबंध कायम ठेवले आहे. शासनाच्या विविध योजना गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले. गावात पहिल्यांदा तात्कालीन जिल्हाधिकारी पी. अन्बलगन यांना आणण्याचे काम केले. ढवळपुरी ते जांभूळबन रस्त्याचे काम मार्गी लावले. विजेचा प्रश्न गंभीर होता तो देखील मार्गी लावला.
मंत्री असूनही तनपुरेंना आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवता आले नाहीत
वावरथ जांभळी, जांभूळबन ही दुर्लक्षित गावी होती. या गावाकडे स्वातंत्र्योत्तर काळात कोणीही लक्ष दिले नाही. मात्र माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे राहुरी तालुक्याचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा गावामध्ये आले आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना गावापर्यंत घेऊन आले. त्यामुळे गावाला गाव पण मिळाले. राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदिवासी खात्याचे मंत्री असताना देखील आदिवासी समाजाचे प्रश्न मार्गी लावू शकले नाही. त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी वाचून दाखवावी अशा आव्हान अविनाश बाचकर यांनी दिले.
राहुरी कारखाना पुन्हा सुरू करू: कर्डिले
तनपुरे कुटुंबियांनी सत्तेच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचे वाटोळे केले. सहकारी संस्था बंद पाडण्याचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची जबाबदारी सत्यजित कदम यांच्यावर देतो. त्यांना जी काही मदत लागेल ते केली जाईल. शेरी चिखलठाणा ग्रामस्थांनी मला 21 हजार रुपयाची निवडणुकीसाठी मदत केली ही मला 21 कोटी सारखी आहे, असे कौतुकोद्गार कर्डिले यांनी काढले.
गावकरीच भाजपच्या कामांची यादी वाचून दाखवत आहेत: सत्यजित कदम
राहुरी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांमध्ये कुठलेही विकासाचे भरीव काम केलेले दिसत नाही. मात्र गावोगावी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामाची गावकरी यादीच वाचून दाखवीत आहेत. तालुक्यातील युवकांनी निवडणूक हाती घेतली असल्यामुळे परिवर्तन अटळ आहे. कुठल्याही भूलथापांना व अफवांवर विश्वास न ठेवता भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मतदान करावे असे आव्हान देवळाली प्रवारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले.
0 Comments