शहराच्या विकास कामांमुळेच नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
आमदार संग्राम जगताप : रेल्वे टेशन आगरकर मळा आनंदनगर परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधला
नगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. आणि जनतेचे मतरूपी आशीर्वाद घेण्यासाठी शहरात फिरत असताना मी केलेल्या विकास कामांमुळेच नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत केले, जाते गेल्या दहा वर्षांमध्ये नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लावले आहेत. स्टेशन रोड परिसरातील काठवण खंडोबा रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. आगरकर मळ्यातील ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होऊन स्टेशन रोड परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठीजवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
तसेच रेल्वे टेशन सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लावले. याचबरोबर या भागातील अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, रस्ते ,पथदिवे व जेष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहेत. सर्वांना बरोबर घेऊन शहर विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मन भारावून गेले असून मी विकासाच्या अजिंठावरच निवडणूक लढवीत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ रेल्वे टेशन आगरकर मळा आनंदनगर परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, सुनील काळे, भैय्या कांबळे, दत्ता, खैरे चंद्रकांत औशीकर, सतीश खैरे, दत्ता गाडळकर, अनिकेत आगरकर, बाळासाहेब ठुबे, अरुण नाणेकर, हेमंत थोरात, प्रमोद कुलकर्णी, राजू जाधव, दीपक लोंढे, शरद दळवी, सोमनाथ रोकडे, बंटी जाधव आदी उपस्थित होते.
स्टेशन रोड परिसराच्या विकास कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता त्या माध्यमातून विविध विकासाची कामे पूर्ण झाले आहेत. याचबरोबर आमदार संग्राम जगताप हे थेट नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत असल्यामुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे आज नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी दिली.
0 Comments