प्रा. शशिकांत गाडे यांचा महाआघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना जाहीर पाठिंबा

 प्रा. शशिकांत गाडे यांचा महाआघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना जाहीर पाठिंबा 


अहिल्यानगर :  शहर विधानसभा निवडणुकीत काल घडलेल्या अर्ज माघारीच्या नाट्यमय घड़ामोडीनंतर आज ( मंगळवारी ) पुन्हा राजकीय ट्विस्ट पाहयला मिळाला.महाआघाडीतुन बंडखोरी केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे यांनी आज महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा जाहिर केला .

यावेळी प्रा. गाडे म्हणाले की , माघारीचा अर्ज चुकुन कार्यकर्त्यांच्या हातात राहिला.दुसरा अर्ज लिहीपर्यत वेळ संपली, मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत असुन स्वतः उमेदवार समजून सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत .

 खा . निलेश लंके यांनी महाआघाडीची एकजुट ठेऊन नगर शहर दहशत मुक्त करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची विनंती केली.  

. यावेळी खा . निलेश लंके , माजी आमदार दादाभाऊ कळमकर , माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम , विक्रम राठोड , कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, बाळासाहेब बोराटे , योगिराज गाडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments