देवळाली प्रवरात हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई

 देवळाली प्रवरात  हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई


विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

 राहुरी : दिनांक २५/१०/२०२४ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभाग यांनी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क राहुरी १ विभाग यांच्या समवेत विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने संयुक्त गुन्हाअन्वेषण मोहिमेत देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभागाचे निरीक्षक श्री. चंद्रकांत सीताराम रासकर यांनी दिली. 

सदर कारवाई मध्ये एकूण ७ गुन्हे नोंद करण्यात आले असून २८९० ली. रसायन व १३०ली. हातभट्टी गावठी दारू नष्ट करण्यात आले. सदर गुन्ह्यात एक दुचाकी होंडा सी बी शाईन जप्त करण्यात आली वमुद्देमालाची एकूण किंमत रु.१,९२,४५०/- रु इतकी आहे. सदर कारवाईत एकूण ७ आरोपी वर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्री. सागर धोमकर विभागीय उपआयुक्त रा. उ. शु. पुणे विभाग पुणे, श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक,रा.उ.शु अहिल्यानगर, श्री. प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक, रा.उ.शु अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. चंद्रकांतसीताराम रासकर, निरीक्षक,राहुरी विभाग, दुय्यम निरीक्षक श्री.शितलकुमार पाटील,दुय्यम निरीक्षक श्री.एम.बी.साळवे,स.दु.नि.श्री.एस.बी.विधाटे, जवान श्री.एन. पी. बुरा, जवान एस. जी. गुंजाळ, जवान ए. ए. कांबळे,म.जवान कु. जे. आर. पठाण,जवान श्री.एस.बी.घुले,म.जवान श्रीमती.एस.बी.डोंगरे,म.जवान कु. एस. आर. पठाण, म. जवान श्रीमती ए. एस. वाघमोडे यांनीसहभाग घेतला आहे.

अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणारअसल्याची माहिती श्री.चंद्रकांत सीताराम रासकर, निरीक्षक,राहुरी विभाग,यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments