खरेदीसाठी गजबजलेल्या बाजारपेठेत अभिषेक कळमकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर : शहरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने सर्व बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडालेली असतानाच विधानसभा प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिषेक बाळासाहेब कळमकर यांची प्रचार यात्रा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये येताच पाहायला मिळाला.
अभिषेक कळमकर यांनी प्रत्येकाला दीपावलीच्या शुभेच्छा देत महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करताना दिसले. नागरिकही मोठ्या उत्साहाने अभिषेक यांच्याशी संवाद साधत होते.
व्यापारी व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या मध्ये प्रचाराच्या निमित्ताने विधानसभेच्या मतदानाची जागृती ही झालेली पाहायला मिळाली. या प्रचार फेरी मध्ये तरुणांचा उत्साह अधिक होता.
प्रचारादरम्यान जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल् उमेदवार अभिषेक कळमकर यानी जनतेचे आभार मानले. .
0 Comments