दिव्य दृष्टी संस्थेचे कार्य अल्पावधीतच नगर शहर व जिल्ह्यातील दिव्यांग यांना प्रेरक ठरणार
पद्मश्री पोपटराव पवार : दिव्य दृष्टी संस्थेच्या वतीने आयोजित दीपोत्सव अंतर्गत स्वर दिपावली या कार्यक्रमाचे उद्घाटन
नगर : अंध व दिव्यांग हे स्वतः च्या पायावर उभे राहून समाजात सकारात्मक संदेश देत आहेत. सी.एस.आर. च्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था कडून विविध उपक्रम उदयाला येत आहेत. दिव्य दृष्टीच्या कामाला जनाधार आणि सी एस आर मिळाला तर अल्पावधीतच नगर शहर व जिल्ह्यातील दिव्यांग यांना प्रेरक ठरणार असे प्रतिपादन आदर्श गाव चळवळीचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार यांनी आज नगर येथे माऊली सभागृह येथे केले. ते आज दिव्य दृष्टी संस्थेच्या वतीने आयोजित दीपोत्सव अंतर्गत स्वर दिपावली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
नगर शहरातील माऊली संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उद्योजक धनेश बोगावत, अभिनेते महेश काळे, प्रा. विजय कदम, प्रेरक वक्ते एन बी धुमाळ, ब्रिगेडियर राजू चावला, सेंट्रल बँकेचे रिजनल मॅनेजर शैलेंद्र कुमार सिन्हा, चीफ मॅनेजर गुलदानंद गोहर, रवींद्र चिपळूणकर, अजिंक्य सुरवसे प्रायोजक डॉ.शैलेश नेमाने, डॉ.रुपाली नेमाने, आकांशा संस्थेचे सविता काळे, सिक्युएव्ही चे कर्नल सावळेकर, रेडिओ सिटी 91.1 एफ एम चे आर जे प्रसन्न पाठक, माऊली संकुल चे संचालक दिनकर घोडके, चंदुकाका सराफ च्या पौर्णिमा पवार, सप्तरंग प्रिंट चे नंदेश शिंदे, अन्न छत्र चळवळीचे नाना भोरे, किशोर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. श्री पोपटराव पवार आपल्या मनोगतात त पुढे म्हणाले की, दिव्य दृष्टी संस्थेचे दिव्यांग आगामी काळात दिव्यांग पुनर्वसनाचे विविध प्रकल्प सुरू करीत आहेत यासाठी मी स्वतः सी एस आर मधून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. पवार म्हणाले.
रेडिओ सिटी 90.1 एफ एम हे या स्वर दिपावली कार्यक्रमाचे रेडिओ पार्टनर होते. या कार्यक्रमात दिव्य दृष्टीचे अध्यक्ष कृष्णा तवले यांनी आपल्या प्रास्ताविकात दिव्यांग यांना एकत्र करून भविष्यात मूलभूत शिक्षणाचे विविध प्रकल्प दिव्य दृष्टी संस्था सुरू करणार असल्याचा संकल्प उपस्थित यांना सांगितला. दिव्य दृष्टी च्या मदत केलेल्या सर्व प्रायोजक आणि दात्यांचे आभार श्री तवले यांनी मानले. या कार्यक्रमाचे आभार सुभाष शिंदे यांनी मानले.
स्वर आले दुरुनी ते सुर निरागस हो या गाण्यांनी स्वर दिपावली मैफिल रंगली.
अंध गायक निलेश शहादेव शिंदे, सुहास नरवडे, वर्षा पड्याळ, अलका शिंदे, सौदागर लोंढे, अंकुश जाधव , सलीम आतार या कलाकार यांच्या गायन वादनाने सर्व उपस्थित नगरकर यांची संगीत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले तर आभार दिव्य दृष्टीचे सुनील बाचकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी दिव्य दृष्टीचे संचालक सुभाष शिंदे, किरण खेतमाळीस,धवण उम्रेडकर, अमोल चव्हाण परिश्रम घेतले.
0 Comments