निशांत दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात

 निशांत दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात


   अहिल्यानगर - अनेकानेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त निशांत दिवाळी अंकाची 24 वी आवृत्ती वाचकांच्या भेटीसाठी उपलब्ध झाली असून, या वर्षी पहिल्यांदा राज्य पातळीवरील पुणे येथील बुक गंगा या ऑनलाईन पुस्तक विक्री करणार्‍या एजन्सीने पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या दिवाळी अंकाचा मुखपृष्ठावर समावेश केल्याने हा नगरकरांचा बहुमान असल्याचे संपादक निशांत दातीर यांनी सांगितले.

  यावर्षीच्या दिवाळी अव्हानाचा डोंगर... उपायांचा नांगर... या राजयकीय  परिसंवादात जेष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी, जयदेव डोळे, प्रमोद मुजमदार, अनिकेत जोशी, भालचंद्र कानगो यांचे अभ्यासपूर्ण मत प्रदर्शित करण्यात आले आहे. उद्याच्या सदृढ सक्षम महाराष्ट्रसाठी या परिसंवादात नागरीक बँकांचा अस्तित्वाचा लढा, सहकारातले दुध का नासले, साखर उद्योग वाचविण्यासाठी या परिसंवादात जेष्ठ पत्रकार भागा वरखडे, बँकींग रंजित श्रीगोड, वसंतराव कवादे, कैलास ढोले, कृषीतज्ञ प्रा.अशोक ढगे आदींचे मत प्रदर्शित करण्यात आले आहे.
 मिशन 2047 या विषयावर माहिती तंत्रज्ञान शैक्षणिक तज्ञ डॉ.दिपक शिक्रापुर, अजय वाळींबे, निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर, मुंकूद गायकवाड, अनंत सरदेशमुख, विवेक वेलनकर, असिम सरोदे, प्रविण दिक्षित आदी मान्यवरांचे लेख आहे. पुन्हा जगेन ते क्षण.. या विषयावर सुप्रसिद्ध अभिनेते योगेश सोमन, सुबोध भावे, डॉ.रघुनाथ माशेलकर, सुप्रसिद्ध गिर्यारोहक, उमेश झिरपे, सामाजिक कार्यकर्ते ममता सपकाळ, पत्रकार निशांत दातीर आदींचे अभ्यासपुर्ण  आठवणी मांडण्यात आले आहे. सभा की भास... या लेखात  नागेश शेवाळकर, मंगळाची कुंडली या लेखात दत्तात्रय म्हेतर, खिलाडू वृत्तीचा मैत्रिपुर्ण अध्याय... अशिष निनगुनकर, तु हवा होतास... अमोल कोरडे, चंगळवादी जीवनशैलीचे प्ररिणाम... सौ.सुनिता तागड, रघु अमोल लंढे, स्मृती सणांच्या... भारती सावंत, वाचन का गरजेचे आहे... विनोद पंचभाई आणि सर्वोच्च नोबल पुरस्कारासाठी याविषयावर डॉ.सुधा कांकरीया यांचे अभ्यासपुर्ण लेख आहे.
   यावर्षींच्या दिवाळी अंकात राशी भविष्य ज्योतिष भास्कर नारायण कारंजकर यांचे असून अ‍ॅड. सुहास टोणे, मितवा श्रीवास्तव, उद्धव भयावाळ, अंकिता अहुजा व प्रकाश पोळ यांच्या कविता आहेत.   एकूण 152 कृष्ण धवलपाने व 12 रंगीत पानांचा समाविष्ठ असलेला अंक आहे.

Post a Comment

0 Comments