‘सक्षम’ तर्फे दिवाळी फराळाचे वाटप

 ‘सक्षम’ तर्फे  दिवाळी फराळाचे वाटप

     नगर - सक्षम अर्थात समदृष्टी क्षमता विकास एवम् अनुसंधान मंडळातर्फे सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी कार्यरत अखिल भारतीय संघटन यांनी दिवाळीनिमित्ताने दिव्यांगाबरोबर भाऊबीज साजरी करुन दिवाळी फराळाचे वाटप केले.

     यावेळी सक्षम संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर बापट म्हणाले की, ‘सक्षम’ नेहमीच समाजातील गरजू गरीब व दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करीत असून त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. तर दिवाळीच्या मंगलमय वातावरणात आनंदी उत्साही व आरोग्यदायी दिवाळी कशी साजरी करावी यांचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजीव चिटगोपेकर यांनी केले. याप्रसंगी ‘सक्षम’तर्फे 110 दिव्यांग व्यक्तींना फराळ व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

     याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष सुनिल जगधाळे, उपाध्यक्षा संध्या कुलकर्णी, सचिव वर्षा रोडे, भारती कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, तर सेवा भारतीचे डॉ.मनोहर देशपांडे, उदय भणगे आणि ‘सक्षम’ चे कार्यकारीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments