अभियंता पतसंस्थेचे कार्य पारदर्शक - रोहिदास लांडगे

 अभियंता पतसंस्थेचे कार्य पारदर्शक - रोहिदास लांडगे

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

नगर - अहिल्यानगर येथील शासकीय सेवेतील अभियंत्यांची सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच माऊली संकुलात मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

     या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य प्रवर्तक व आजीव अध्यक्ष रोहिदास लांडगे होते. यावेळी प्रमुख अतिथी मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, अधिक्षक अभियंता बी.के.शेटे, कार्यकारी अभियंता जे.बी.संचेती, व्ही.जी.ठुबे, ए.वाय.आंधळे,एस.एस.घोडके,एस.पी.राजगुरु के.बी.दंडगव्हाळ,पी.जी.येळाई तसेच सभासद उपस्थित होते.

     अध्यक्षीय भाषणात श्री. रोहिदास लांडगे यांनी पतसंस्थेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. अभियंता पतसंस्थेचे कार्य पारदर्शक असे आहे. सभासदाभिमुख कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

     या सभेमध्ये गुणवंत पाल्यांचा तसेच सेवानिवृत्त झालेले व पदोन्नती मिळालेल्या सभासदांचा सत्कार श्री. लांडगे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे मुख्य प्रवर्तक रो.मा.लांडगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने  अभिष्टचिंतन करुन सत्कार करण्यात आला. या निमित्ताने  मोबाईल अ‍ॅपचे अनावरण श्री.लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी संस्थेचे चेअरमन प्रल्हाद पाठक यांनी प्रास्तविकात अहवाल सालातील कामकाजाचे सविस्तर विश्‍लेषण केले. पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन सभासदांनी मान्यता दिली. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना प्रल्हाद पाठक व व्यवस्थापक विजय रक्ताटे यांनी समर्पक उत्तरे दिली. सभेचे शेवटी सर्वांचे आभार व्हा.चेअरमन अभिजित देशमुख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments