ठेकेदाराला मागितली दहा लाखांची खंडणी

 ठेकेदाराला मागितली दहा लाखांची खंडणी 

 सोमनाथ कराळे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल

नगर : पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराला दहा लाखाची खंडणी मागत जर पैसे दिले नाही तर काम बंद पाडण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमनाथ कराळे राहणार नागापूर यांच्यासह त्याच्या एका अनोळखी साथीदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

       याबाबत अंकित पारस पिचा राहणार अमोल विहार सावेडी यांनी फिर्याद दिली आहे, फिर्यादी बीपीसीएल कंपनीच्या गॅस पाईपलाईनचे काम करतात ते ५ ऑक्टोबर रोजी कामानिमित्त एमआयडीसी ऑफिसच्या बाहेर उभे असताना तिथे आरोपी सोमनाथ कराळे व त्याचा एक साथीदार असे दोघे आले त्यातील कराळे हा फिर्यादीस म्हणाला की गॅस पाईपलाईनचे कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच का ?  तुम्हाला एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज करायचे असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला माझ्या परवानगीशिवाय कामकाज चालू करता येणार नाही, तेव्हा फिर्यादी त्यास म्हणाला की, तुम्हाला पैसे का द्यायचे ? तेव्हा आरोपी सोमनाथ कराळे यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत म्हणाला की मी या गावचा दादा आहे, तू मला पैसे दिले नाही तर, मी तुझे कामकाज चालवून देणार नाही, तसेच तुझ्या कामगारांना मारहाण करून त्यांना पळून लावेल व तो तिथून निघून गेला. 

 त्यानंतर मंगळवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचे कामगार हे एमआयडीसी येथे काम करीत असताना यातील आरोपी सोमनाथ कराळे याचा अनोळखी साथीदार तिथे आला व फिर्यादीस म्हणाला की तुम्हाला सोमनाथ कराळे यांनी कामकाज बंद करण्यास सांगितले असून कामकाज जर चालू केले तर वाईट परिणाम होतील अशी धमकी देऊन लागला त्यानंतर त्याने त्याच्या मोबाईल फोन वरून कराळे यास फोन लावला त्यांनी ही फोनवरून फिर्यादीस पुन्हा धमकी दिली की तुम्ही दहा लाख रुपये द्या, नाहीतर तुमचे कामकाज चालून देणार नाही . 

त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी व कामगारांना शिवीगाळ दमदाटी करत म्हणाला जर पुन्हा कामकाज चालू केले तर हातपाय तोडून टाकील अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. त्या फिर्यादीवरून सोमनाथ कराळे यांच्यासह त्याच्या एका अनोळखी साथीदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

Post a Comment

0 Comments