अहमदनगर महाविद्यालयात मतदार जागृतीवर डॉ. सुधीर वाडेकर यांचे प्रभावी व्याख्यान

 अहमदनगर महाविद्यालयात मतदार जागृतीवर डॉ. सुधीर वाडेकर यांचे प्रभावी व्याख्यान


     नगर - अहमदनगर महाविद्यालयात ‘मतदार जागृती’ या महत्त्वपूर्ण विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मतदान प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.

     कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सुधीर वाडेकर यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनातून मतदारांच्या हक्क, जबाबदार्‍या आणि मतदान प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विशेषतः तरुण मतदारांना उद्देशून मतदानाचा अधिकार आणि कर्तव्ये समजावून सांगितली. मतदानाच्या माध्यमातून समाजात कसे सकारात्मक बदल घडवता येतात, याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता कशी राखली जाते याबाबत माहिती दिली.

   कार्यक्रमात उपप्राचार्य नोएल पारगे, रजिस्टर पीटर चक्रनारायण, ई.टी.आय.समन्वयकडॉ. गोकुळदासगायकवाड,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट सिनारे, डॉ. प्रबंधिका शेलार, डॉ. रविंद्र मते, डॉ.पवनजित छाबडा आणि प्रा. संतोष कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग म्हस्के यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन यश कच्छवा यांनी केले.

Post a Comment

0 Comments