धार्मिक,तात्विक व विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमाने वर्षावास सांगता

 धार्मिक,तात्विक व विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमाने वर्षावास सांगता


     नगर -  संभाजीनगर रोड, चेतना लॉन येथे वर्षावास समारंभात धम्मगिरी बुद्धविहारची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. विहारात उपासक, उपासिकां यांनी धार्मिक विधी, परित्राणपठण केले,  पूजा करण्याचा मान अविनाश भोसले परिवार व आशा कांबळे परिवार यांना मिळाला. उपासिका अमृता साळवे ,कल्पना कांबळे, सुवर्णा पानपाटील ,प्रतिभा देठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित  द बुद्ध अँण्ड हिज धम्मा  या ग्रंथाचे वाचन केले.

     सांस्कृतिक कार्यक्रमासात  मानसी’ज डान्स स्टुडिओ  वतीने सुनो सिद्धार्थ कथा, देश रंगीला , बुद्ध ही बुद्ध हे  या गीतांतून नृत्य सादर केल . उपस्थित बाल उपासकांनी विविध कला सदर केली. नुरवी घोडके, किर्ती साळवे यांनी भाषण केले. नृत्य ,कला सादर केलेल्या सर्व मुलांना गिफ्ट व प्रमाणपत्र प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्या हस्ते देण्यात आले. कराटे चॅम्पियन कु. संगिनी मोरे हिला  भारत देशातून तिसर्‍या रँक वर नामांकन मिळाले ,

 एकूण 92 पदके व  प्रणामप्रत्र मिळाल्याने  बौध्द संस्कार संघाचे वतीने ( से.निवृत्त सहाय्यक संचालक , आरोग्य सेवा पुणे ) डॉ. एस. एम. सोनवणे , (सहाय्यक अभियंता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहिल्यानगर ) इंजि. किरण साळवे ( से. नि. विक्रीकर अधिकारी ) एम. बी. साळवे, (से.नि.वजन मापे अधिकारी ) संजय वाघमारे , (पीडब्ल्यूडी  विभाग) निलेश महाजन, डॉ.रमेश भिंगारदिवे, अ‍ॅड. बळीराम ऊके, , यांच्या हस्ते   सन्मानपत्र देण्यात आले. तिने काही प्रात्यक्षिके करून  दाखविले . प्रज्ञारत्न  कमवीर भास्कर साळवे  यांनी प्रवचनातून सतिसाधनेचे तत्वज्ञान सांगितले . ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांना वस्त्रदान  केले. त्यांनी आयुष्य समर्पित करुन बुध्दांनी सागीतलेले जागृतीचा सिध्दांत  सापडल्याने  त्यांना सतिसाधनाचे तत्ववेता ही पदवी देण्यात आली.

        कार्यक्रमाचे निवेदन डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नृत्यदिग्दर्शका मानसी देठे , शशांक अंबावडे, राजवर्धन कांबळे, केतन देठे, डॉ प्रताप घोडके, संतोष आहेर, अशोक साळवे सर,   भागचंद सातपुते सर ,डॉ रविकांत पाचारणे, अविनाश रणदिवे, डॉ. योगेश सोनवणे. यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments