बोल्हेगाव येथील इमाम सय्यद यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

 बोल्हेगाव येथील इमाम सय्यद यांचा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश


कुमारसिंह वाकळे  :  नागापूरचा विकास कामांतून झालेल्या कायापालठामुळे नागरिकांचा विश्वास संपादन करू शकलो  

नगर : बोल्हेगाव - नागापूरचा विकास कामांतून झालेल्या कायापालठामुळे नागरिकांचा विश्वास संपादन करू शकलो आहे या भागामध्ये कधीही न झालेली विकास कामे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत या भागामध्ये सर्वसामान्य व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना पाणी लाईट रस्ते ड्रेनेज आदी मूलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. बोल्हेगाव हा पूर्वी ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात होता मात्र आता विकास कामाच्या माध्यमातून शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे नागरिकांना बरोबर घेऊन केलेल्या विकास कामांमुळे या भागातील नागरिकानी आता आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा संकल्प केला असून सामाजिक कार्यकर्ते इमाम सय्यद यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले

 


       बोल्हेगाव येथील इमाम सय्यद यांचा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश संपन्न झाला. यावेळी त्यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी अल्पसंख्या विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहेबान जहागीरदार म्हणाले की नगर शहराला विकास कामे करणारे नेतृत्व मिळाले आहे सर्वांना बरोबर घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जात आहे त्यामुळे समाजातील विविध स्तरातून आमदार संग्राम जगताप यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी इमाम सय्यद यांची निवड करण्यात आली असून त्यांचे समाजाप्रती असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून त्यांचा उपयोग नक्कीच चांगल्या कामासाठी होईल असे ते म्हणाले

         इमाम सय्यद म्हणाले की बोल्हेगाव परिसरामध्ये गेल्या १० वर्षांपूर्वी कुठल्याही विकासाच्या सुविधा नसल्यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत होते मात्र कुमार सिंह वाकळे यांच्या रूपाने या भागाला नेतृत्व मिळाले आणि त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले त्यामुळे आम्ही सर्व नागरिक आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत असे ते म्हणाले

Post a Comment

0 Comments