भाजपच्या पहिल्या यादीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर

बुऱ्हानगर येथे कार्यकर्त्यांचा फटाके वाजून जल्लोष साजरा

नगर : विधानसभा निवडणूक 2024 ची निवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पार्टीने राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांची पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केले असून कार्यकर्त्यांनीबुऱ्हानगर येथे फटाके वाजून व एकमेकांना पेढे खाऊ घालून जल्लोष केला.


माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की गेली ३० वर्ष जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले असून गेल्या ५ वर्षांमध्ये मी लोकप्रतिनिधी नसताना देखील राज्य शासनाकडून मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. जनतेच्या विश्वासावर मी नक्कीच विजय होणार आहे भारतीय जनता पार्टी च्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकून पहिल्या यादीत माझे नाव जाहीर केले त्यांच्या विश्वासाला मी नक्कीच पात्र राहील .


राहुरी पाथर्डी नगर मतदार संघामधील विजय कार्यकर्त्यांच्या पाठबळावर खेचून आणार आहे जनता ही सध्याच्या लोकप्रतिनिधीला कंटाळली असून त्यांच्या नाकर्त्यापणाला कंटाळली आहे जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होत दररोज जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू आहे अशी प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर होतात चिमुकल्या नात्याच्या हस्ते पेढे खाऊन आनंद उत्सव साजरा करत विजयाचा निश्चय केला.  

Post a Comment

0 Comments