सरसय्यद अहमदखान यांच्यामुळे मुस्लिम समाजाचं नव्हे तर, संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिकला

 सरसय्यद अहमदखान यांच्यामुळे मुस्लिम समाजचं नव्हे तर, संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिकला  

डॉ.प्रा.अब्दुस सलाम : मौलाना आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले शाळेत स्वातंत्रता सेनानी सरसय्यद अहमद खान यांची जयंती साजरी

नगर- पारंपारिक मदरसा प्रणित शिक्षण व्यवस्था आणि ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात आलेली चर्चप्रणित शिक्षण व्यवस्था यातील संघर्षात पारंपारिक मदरसाप्रणित शिक्षण व्यवस्थेला आधुनिक शिक्षणाची जोड देण्याचे महत्वपूर्ण कार्य सर सय्यद अहमदखान यांनी पार पाडले. म्हणूनच डॉ.राजेंद्रप्रसाद आणि डॉ.जाकीर हुसेन सारखे राष्ट्रपती याच मदरसा शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होऊ शकले. त्यांच्यामुळे केवळ मुस्लिम समाजाचं नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊ लागला. त्यांनी मध्ययुगीन भारतातील चाळीसपेक्षा जास्त अरबी, फारशी ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे केली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले.

मुकुंदनगर येथील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत स्वातंत्र्य सेनानी सर सय्यद अहेमद खान यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर सय्यद अहमद खान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, प्राचार्या फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, असलम पटेल, फरीदा जहागिरदार, सोलापूरे नाहीद, नाजेमा शेख, खतीजा खान, नफीस अंजुम, सदफ शेख, शेख शाहीन, शेख फरजाना, शेख सुलताना, शेख मुमताज, शेख यास्मिन, शेख हिना आदि उपस्थित होते.

प्रास्तविक करतांना प्राचार्या फरहाना सय्यद यांनी सांगितले की, आज आपण स्वत:चे वाढदिवस थाटामाटात साजरे करत असतो; पण ज्यामुळे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात फार उदासिनता जाणवते, ही समाजाचे दुर्भाग्य आहे, असे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलायका व सिदरा यांनी केले, तर आभार फरिदा जहागिरदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मौलाना आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments