मनपा पतसंस्थेने सभासदांच्या आरोग्याची काळजी घेतली
चेअरमन बाळासाहेब पवार : महानगरपालिका पतसंस्थेच्या वतीने दुर्धर आजाराच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त
अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदाच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सभासद विश्वनाथ बबन वाघमारे यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करताना चेअरमन बाळासाहेब पवार, व्हा. चेअरमन सोमनाथ सोनावणे समवेत ज्येष्ठ संचालक जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, बाळासाहेब गंगेकर, किशोर कानडे, श्रीधर देशपांडे, अजय कांबळे, गुलाब गाडे , कैलास चावरे , बलराज गायकवाड, विकास गीते, विजय कोतकर, संचालिका प्रमिला पवार, उषा वैराळ,कार्यलक्ष्मी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
सभासद विश्वनाथ बबन वाघमारे यांनी सांगितले की, मनपा कर्मचारी पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हितासाठी काम केले आहे, सभासदांच्या आजारपणावरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जात असून अडीअडचणीच्या काळात पतसंस्था सभासदांच्या मागे उभे राहते पाल्यांचे शिक्षण, लग्नकार्य यासाठी तात्काळ कर्ज रुपी अर्थसहाय्य दिले जाते हे कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
0 Comments