।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा ।।
देवी ब्रह्मचारिणी
देवी पार्वतीने दक्ष प्रजापतीच्या पोटी जन्म घेतल्यानंतर सतीच्या रूपात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केलेल्या अविवाहितेच्या रूपाला ब्रह्मचारिणी असे म्हटले जाते.लाल हा देवी ब्रम्हचारीणीचा आवडता रंग आहे.
पूजन: नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी देवी ब्रह्मचारिणी चे पूजन केले जाते.
अधिपत्यातील ग्रह: देवी ब्रह्मचारिणी च्या अधिपत्याखाली मंगळ हा ग्रह येतो.
देवीचे वर्णन:
उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू घेऊन अनवाणी पायाने मार्गक्रमण करणारी देवी ब्रह्मचारिणी ही महादेवाला वरण्यासाठी तपश्चर्या करते त्यामुळे तिला ब्रह्मचारिणी असे म्हटले जाते. महादेवच पती म्हणून मिळावा यासाठी देवी ब्रह्मचारी ने एक हजार वर्ष फळ मुलांचा आहार घेतला व पुढची शंभर वर्षे पालेभाज्यांचे सेवन केले. रखरखत्या उन्हात,कडाक्याच्या थंडीत आणि वादळी पावसात जमिनीवर झोपायची. पुराणकथेनुसार तीन हजार वर्षांपर्यंत बेल पानांचा आहार घेऊन तिने महादेवाची तपश्चर्या केली मात्र नंतरच्या काळात तिने अन्नपाण्याविना तपश्चर्या केल्याने तिला अपर्णा म्हणूनही ओळखले जाते.
दंतकथेनुसार देवी ब्रह्मचारिणी ने विजनवासात राहून किमान पुढच्या जन्मात तरी महादेवाचा जावई म्हणून स्विकार करणारा पिता मिळावा अशी प्रार्थना केली.
देवी शैलपुत्री प्रमाणेच ब्रह्मचारिणी देवीलाही चमेलीची फुले प्रिय आहेत.
मंत्र :
ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः॥
प्रार्थना :
दधाना कर पद्माभ्यामक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥
स्तुती :
या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
देवी ध्यानम :
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
जपमाला कमण्डलु धरा ब्रह्मचारिणी शुभाम्॥
गौरवर्णा स्वाधिष्ठानस्थिता द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम्।
धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालङ्कार भूषिताम्॥
परम वन्दना पल्लवाधरां कान्त कपोला पीन।
पयोधराम् कमनीया लावणयं स्मेरमुखी निम्ननाभि नितम्बनीम्
स्तोत्र :
तपश्चारिणी त्वंहि तापत्रय निवारणीम्।
ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्॥
शङ्करप्रिया त्वंहि भुक्ति-मुक्ति दायिनी।
शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्॥
देवी कवच:
त्रिपुरा में हृदयम् पातु ललाटे पातु शङ्करभामिनी।
अर्पण सदापातु नेत्रो, अर्धरी च कपोलो॥
पञ्चदशी कण्ठे पातु मध्यदेशे पातु महेश्वरी॥
षोडशी सदापातु नाभो गृहो च पादयो।
अङ्ग प्रत्यङ्ग सतत पातु ब्रह्मचारिणी।
0 Comments