अमरधाम येथे महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान

 अमरधाम येथे महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान



आयुक्त यशवंत डांगे : विद्यार्थ्यांना दिला स्वच्छतेचा संदेश

नगर : आपल्या शहरातील सार्वजनिक, धार्मिक, ऐतिहासिक स्थळ महत्त्वाचे असून या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येत असतात, पंधरवडा स्वच्छता सप्ताह निमित्त नालेगाव अमरधाम येथे केशवराव गाडीलकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता अभियान राबविले असून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम केले आहे विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच सामाजिक जाणीवेची भावना निर्माण होईल

नालेगाव अमरधाम मधील वाढलेले गवत, अस्ताव्यस्त पडलेले नैवेद्य, माती, झाडांचा पालापाचोळा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली

        नालेगाव अमरधाम येथे महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनीयर श्रीकांत निंबाळकर, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, परीक्षित बिडकर, बापू साठे, ठेकेदार अनंत पुंड, नितीन फुलसौंदर, ज्ञानेश्वर जंगम, केशवराव गाडीलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल गायकवाड, बाबासाहेब शिंदे, चंद्रकांत डाके, जयश्री देशपांडे, आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वच्छता अभियानामध्ये शिक्षकाची भूमिका बजावत विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले, यामध्ये प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत असून विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील नागरिकांना प्लास्टिक वापरापासून दूर करावे असा संदेश देत हातात झाडू, घमेले, फावडे घेत अमरधामची स्वच्छता करत परिसराला सुंदरतेचे रूप प्राप्त झाले होते

          यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत आपला सहभाग नोंदवला होता. 

Post a Comment

0 Comments