महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी चे नवीन स्रोत निर्माण करावे - उपायुक्त विजयकुमार मुंडे
सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.
नगर : मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता तो सर्वांच्या सहकार्यातून मार्गी लागला असून त्याला यश आले आहे आता त्याची रक्कम सरकार देणार नाही तर आता आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नवीन स्रोत निर्माण करावी लागणार आहे. मनपा कर्मचारी पतसंस्थेचा ज्या पद्धतीने चांगला कारभार करून एक वर्षात दुप्पट भाग भांडवल केले. त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांनी मनपाची थकीत वसुली करण्यासाठी काम करावे शहरामध्ये 80 कोटी थकीत असून त्यावर 120 कोटी व्याज आहे. आता शास्ती माफी केली असून कर्मचाऱ्यांनी थकीत नागरिकांकडे जाऊन त्यांना समजून सांगावे. मनपा हे आपल्या सर्वांचे एक कुटुंब असून एकजुटीने मनपाच्या भरभराटीसाठी काम करावे असे प्रतिपादन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले.
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त मेहेर लहारे,मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार,जल अभियंता परिमल निकम,शहर अभियंता मनोज पारखे,नगररचनाकार सर्वेश चाफळे,अभियंता श्रीकांत निंबाळकर,चेअरमन बाळासाहेब पवार समवेत,व्हा.चेअरमन सोमनाथ सोनवणे, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, विकास गीते,किशोर कानडे,बलराज गायकवाड, अजय कांबळे, विजय कोतकर, कैलास चावरे, गुलाब गाडे, बाळासाहेब गंगेकर, जल अभियंता परिमल निकम,महादेव काकडे,संचालिका प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
यावेळी जल अभियंता परिमल निकम, नगररचनाकार सर्वेश चाफळे यांनी मनोगत वेक्त केली. चेअरमन बाळासाहेब पवार यांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला तर स्वागत जितेंद्र सारसर यांनी केले.
महानगरपालिकेत काम करत असताना कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून त्यांचे प्रश्न मार्गी लागणे तितकेच गरजेचे आहे. आम्ही राज्य सरकारमध्ये काम करत असून आम्हाला गेल्या पाच वर्षांपूर्वीच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे मात्र नगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळाला नव्हता. आता तो मिळाला आहे अधिकारी नेहमीच कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी अग्रही असतात कामगार युनियन आणि मनपा कर्मचारी पतसंस्था ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पतसंस्था ही कामगारांचे आर्थिक प्रश्न मार्गी लावतात तर युनियन देखील प्रशासकीय पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत असते. महापालिका ही स्वयं संस्था असून तिच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण मिळून काम करू असे मत मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित होता तो मार्गी लागावा यासाठी आंदोलने,लॉंग मार्च, निवेदने दिली मात्र तो मार्गी लागला नाही आता युनियनच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी उपोषण केले आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने मनपा कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला. यामध्ये महापालिकेतील अधिकारी यांचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सातवा वेतन आयोगा सहित पगार जमा होईल या कामासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती संचालक बाबासाहेब मुदगल यांनी दिली.
कार्यक्रमाची प्रस्ताविक किशोर कानडे व सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत लोखंडे यांनी मानले.
0 Comments