महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू


 मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू

वेब टीम कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तापला असताना कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून बंद आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषीक देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा होत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात राहणार बंदी आदेश लागू करण्यात आला अहड. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments