डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार



 आरोपीकडून तरुणीची आर्थिक फसवणूक

वेब टीम पुणे :डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने तरुणीच्या नावावर बँकांकडून कर्ज काढून फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

या प्रकरणी आकाश सक्सेना (वय ३८, रा. राेहन मिथीला हाऊस, विमाननगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीचे एका डेटिंग ॲपवर खाते होते. सक्सेना याची डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणीशी ओळख झाली. त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्याने तरुणीकडून कागदपत्रे घेतली. कागदपत्रांचा गैरवापर करुन सक्सेना याने तरुणीच्या नावावर बँकांकडून कर्ज घेतले. त्याने तरुणीची ध्वनिचित्रफीत तयार केली होती. ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तरुणीकडे चार लाख रुपयांची खंडणी मागितली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments