बहिणीची छेड काढणार्या सरपंचाला भावंडांनी धु धु धुतले
अनेकांनी ही धुलाई ‘याची देही… याची डोळा’ बघितली
वेब टीम चंद्रपूर : बहिणीची छेड काढणाऱ्या सरपंचाला भावंडांनी भरचौकात चोप दिल्याची घटना गोंडपिपरी शहरात घडली. सरपंच भाजपचा पदाधिकारी आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली नाही.सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, सरपंच तथा भाजप कार्यकर्त्याने बसमध्ये मुलीची छेड काढली. ही बाब तिने भावंडांना सांगितली. हे ऐकून भावंड पेटून उठले. सरपंच तहसील कार्यालय परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेथे जाऊन भावंडांनी सरपंचाची यथेच्छ धुलाई केली.
सरपंचाची धुलाई झाल्याची वार्ता गोंडपिपरी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे, अनेकांनी ही धुलाई ‘याची देही… याची डोळा’ बघितली. मात्र, सोडवायला कुणीच गेले नाही. दरम्यान, सरपंचानेही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला. मी कोणत्याही मुलीची छेड काढली नाही. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे. याची कुठेही तक्रार नाही, अशी पोस्ट सरपंचाने व्हाट्सअॅप ग्रुपवर टाकली आहे.
0 Comments