कुख्यात गुंडाचे मुख्यमंत्री आणि राजेश क्षीरसागर यांच्या समेवतचे बॅनर

कुख्यात गुंडाचे मुख्यमंत्री आणि राजेश क्षीरसागर यांच्या समेवतचे बॅनर

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मोका गुन्हातील कुख्यात गुंड अमोल भास्कर याचे मोठे मोठे फलक शहरात मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आले आहेत

वेब टीम कोल्हापूर: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मोका गुन्हातील कुख्यात गुंड अमोल भास्कर याचे मोठे मोठे फलक शहरात मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसोबत हे फलक लावण्यात आल्याने त्याची शहरात एकच चर्चा आहे. गुंड अमोल भास्कर व त्याच्या टोळीने शहरात उच्छाद मांडला आहे. त्याच्या विरोधात खून, अपहरण,खाजगी सावकारी, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची मालिकाच नोंद आहे. या कारानाम्यामुळे २८ गुन्हे दाखल असलेल्या अमोल भास्कर टोळीवर गतवर्षी दिवाळी मोका (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना खंडणीप्रकरणी त्यास पकडले होते.

राजकिय शुद्धीकरण

अशा या अट्टल गुंडास राजकीय पवित्र करून घेण्याच्या हालचाली अंतर्गतरित्या सुरू आहेत. अशातच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त कुख्यात गुंड अमोल भास्कर याचे सामाजिक कार्यकर्ता असा उल्लेख असलेले भव्य फलक शहराच्या विविध चौकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या छबी समवेत लागल्याने खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींच्या दृष्टीने हा प्रसिद्धीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments