।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा ।।
"आत्मशांती"चे केंद्र रमादेवी मंदिर
संतांची पावन भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आणि शहरात अनेक संतांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत परमपूज्य श्री भगवान (डॉ.श्रीनिवास पै ) त्यांच्या सहधर्मचारिणी परमपूज्य सौ तारादेवी यांच्या प्रदीर्घ वास्तव्याने या भूमीचे महत्व आणखीनच वाढले आहे. आम्हा सर्वांच्या दिव्य गुरु माता श्री रमादेवी यांचेही वास्तव्य नगर शहराला लाभले, त्यामुळे या नगर शहराला तीर्थ क्षेत्राचे महत्व प्राप्त झाले.
श्री रमादेवींना भक्तजन "माउली"असे संबोधतात माउलींचा खूप मोठा भक्त समुदाय , शिष्यवर्ग जगभरात आहे.नगर मध्येही शिष्य समुदायाची संख्या मोठी आहे. तारा देवींचे वास्तव्य नगर शहरात असताना भक्त मंडळी त्यांच्याकडे जात मार्गदर्शन मिळवीत. त्यांच्या मार्गदर्शनाने भक्तजनांना शांती मिळे श्री माऊलींचेही वास्तव्य काही वर्ष नगर शहरात झाले.
नगर मध्ये माऊलींचे मंदिर व्हावे अशी भक्तांची तीव्र होती. अथक प्रयत्नानंतर झोपडी कॅन्टीन परिसरात श्री रमादेवी मंदिराची उभारणी झाली ३ फेब्रुवारी १९७९ रोजी रथसप्तमीच्या शुभ मुहूर्तावर देवी रमाम्बिकेच्या विग्रहाची (मूर्तीची) प्राणप्रतिष्ठापना झाली.विशेष म्हणजे हि प्राणप्रतिष्ठापना स्वतः परमपूज्य श्री तारादेवी व परमपूज्य श्री भगवान यांच्या हस्ते जाहलेली आहे. स्थापना झाल्यापासून आजतागायत भारतीय संस्कृती व परंपरेनुसार देवीची आराधना व पूजा होत आहे. देवीचा विग्रह कोरीव व रेखीव असा असून मधुर,मनमोहक,रमणीय अश्या या विग्रहाच्या दर्शनाने भक्तांना आत्मशांती मिळते.
गुरुपौर्णिमा,गोकुळाष्टमी , मंदिराचा वर्धापनदिन , श्री माउलींचा जन्मदिन (४ मार्च) , परमपूज्य तारादेवी , परमपूज्य भगवानांचा जन्मदिन , आषाढी एकादशी नवरात्र महोत्सव असे अनेक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात दरवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो मात्र यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे कोरोना संबंधित सामाजिक अंतरपथ्याचे व शासनाच्या आदेशाचे पालन करून उत्सव साजरा होत आहे.नवरात्र महोत्सवात देवीच्या सकाळच्या अभिषेकाचे विशेष महत्व आहे, चंदन , तुळस, वाळा आदी सुगंधि द्रव्यांनी युक्त अश्या पवित्र जलाने देवीला अभिषेक घातला जातो. त्यानंतर महिषासुर मर्दिनी स्तोत्र व अन्य स्तोत्रांचे सामुदायिक पठण होते तसेच दुपारी व संध्याकाळी ललिता अष्टोत्तर , ललिता शास्त्रनामाचे पठण होते. जोगवा ,सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. भारतभर व पसरलेला माउलींचा भक्तवृंद मोठ्या प्रमाणात या सोहोळ्यात सहभागी होत असतो.
0 Comments