मुळा धरणात बुडून एकाचा मृत्यू
वेब टीम राहुरी : राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील अथांग जलसागर व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी दि.१७/०२/२०२२ रोजी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी गर्दी केली.परंतु,त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
दुपारी धरणाच्या पाण्यात उतरलेला नगर शहरातील एक पर्यटक बुडाला.स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी साडेपाच वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.चेतन कैलास क्षिरसागर (वय ३८ रा. श्रमिकनगर,पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर) असे मृताचे नाव आहे.मृत चेतन समवेत त्याचे मित्र बाळकृष्ण धारुणकर,सोमनाथ देवकर, बाळासाहेब शिंदे,संतोष मेहत्रे, निलेश धारुणकर, बाळासाहेब जुंदरे,संदीप शिंदे,आशुतोष भागवत,राजेंद्र करपे,योगेश पतले,नितीन फल्ले,मिलिंद क्षिरसागर (सर्वजण रा.अहमदनगर) असा १३ जणांचा ग्रुप धरणावर पर्यटनासाठी आला होता.
0 Comments