रेडियम,बारकोड संदर्भात तातडीने निर्णय घेणार : उपपरिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार
वेब टीम नगर : स्कुल बसच्या बाबतीत आपल्या कार्यालयातील दलालांकडून रेडियम आणि बारकोडच्या बाबतीत प्रचंड लूटमार होत असून ती थांबविण्याबाबत आपण लक्ष घालावे.अश्या आशयाचे निवेदन शहर वाहतूक सेनेचे संजय आव्हाड यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उद्देमालाताई पवार यांना दिले. यावर हे प्रकरण तातडीने वरिष्ठांकडे पाठवून त्यावर तातडीने निर्णय घेणार असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.
स्कुल बसेसना लावण्यात येणारे रेडियम बाजारात ३०रु. प्रति फूट दराने उपलब्ध असून तेच रेडियम आपल्या कार्यालयातील दलाल ५०रु प्रति फूट दराने लावून देतात. त्यामुळे स्कुल बस चालकांना रेडियम २०रु प्रति फूट इतके महाग पडते. तसेच बारकोड बाबतीतही आहे.रेडियम बाजारातून खरेदी करून बसविल्यास त्याचा खर्च ५०० ते ६०० रु. इतका येतो. तेच रेडियम आपल्या कार्यालया मार्फत दलालांकडून बसविल्यास १५०० ते २००० रु. इतके लागतात. म्हणजेच १००० ते १५०० ची लूट होते.आपल्या कार्यालयामार्फत या दलालांना अशी परवानगी देण्यात आली आहे का?असा प्रश्न पडतो.
वास्तविक पाहता विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी आपल्या कार्यालयाकडून स्कुल बस चालकांना परवाना दिला जात नाही. त्यामुळे सायंकाळी ७ वाजे नंतर आमच्या गाड्या रस्त्यावर धावत नाहीत मग रेडियम आणि बारकोडची अट कशासाठी? हा प्रश्न पडतो.ज्या गाड्यांचे रेडीयम व्यवस्थित असेल त्या गाड्यांना नवीन रेडियम बसविण्याची सक्ती करू नये अशी आमची आपल्या कडे मागणी आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेडियम स्टिकर व बारकोड सक्तीचे नाही कोणत्याही स्कुल बस साठी म्हणजेच ७ + १ साठीही बारकोड सक्तीचा नसताना नगर जिल्ह्याचे नियम वेगळे आहेत का? कि त्या आडून मलिदा खाण्याचा मार्ग शोधला जातोय ? असा प्रश्न पडतो.
याव्यतिरिक्त आम्हला पुढील मुद्यांवर लक्ष वेधायचे आहे.सदर गाड्यांना कोणकोणते रेडियम, रेफलोमॅक्स, ३ एम, रिफ्लेक्टिक या कंपन्यांना मान्यता आहे का ? असल्यास त्याची ट्रेड व्हॅलिडिटी किती ?, नगर मध्ये किती जणांना ट्रेंड सर्टिफिकेटची मान्यता दिली आहे? त्यांची कार्यालये कुठे आहेत. ते कोणत्या कोणत्या गाड्यांना रेडियम बसवू शकतात. रेडियम बसवण्याची जागा त्यांच्या कडे आहे का? ते रेडियम त्यांच्या कार्यालयात का बसवत नाहीत? असे प्रश्न आम्हाला पडतात या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास आमच्या शंकांचे निरसन होऊ शकेल.असे अखिल विद्यार्थी संघाचे प्रमुख व नाशिक विभागीय वाहतूक संघाचे संजय आव्हाड यांनी सांगितले.यावेळी अर्जुन ढोबळे हेही उपस्थित होते.
0 Comments