पळशी बालिका अत्याचार प्रकरणात आरोपीला दहा वर्षाचा कारावास

पळशी बालिका अत्याचार प्रकरणात आरोपीला दहा वर्षाचा कारावास 

वेब टीम पारनेर : तालुक्यातील पळशी गावामध्ये 2016साली अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपी पोपट शंकर साळवे याला जिल्हा न्यायाधीश क्रमांक तीन श्रीमती माधुरी भारतीय दंड विधान क्रमांक 376 दोन व 511 नुसार दहा वर्षे कारावास तसेच दहा हजार रुपयांचा दंड व पोस्को कायद्यानुसार सात वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे

पळशी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील एका सहावर्ष पाच महिने वयाच्या  बालिकेवर त्याच गावातील पोपट शंकर साळवे यांने लैंगिक अत्याचार केला होता. सदर आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होता.दिनांक 8 ऑक्टोबर,2016 सोळा रोजी आरोपी साळवे यांनी पीडित मुलगी हिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्या आजोबांच्या शेतातच निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

सदर घटनेमुळे पारनेर तालुक्यामध्ये क्षोभ निर्माण होऊन ग्रामस्थांच्या तर्फे पारनेर बंदची हात देण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून दोषी व्यक्तीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नेमणूक करण्यासंबंधी शासन पातळीवर पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने शासनाने ॲड .यादव-पाटील यांची या प्रकरणात नियुक्ती केली होती.

 पळशी येथे 2016साली घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी महाराष्ट्रभर प्रकरण गाजल्याने या प्रकरणी विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती त्यांना सहाय्यक म्हणून ॲड . सचिन अशोक पाटेकर यांनी काम पाहिले.  या प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. 

सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष, घटनास्थळ पंचनामा, घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू, त्याचप्रमाणे आरोपीच्या अंगावर आढळून आलेली घटनास्थळावरील मातीचा डाग, रक्ताचा डाग आणि इतर वस्तुस्थितीजन्य  पुरावयाची भक्कम साखळी न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. तपासी अधिकारी म्हणून भोईटे एस डी पी ओ आणि आरडी पवार तर कोर्ट भैरवी म्हणून एम वी डहारे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments