देशात करोनाची छोटी लाट येऊ शकते; WHO च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

देशात करोनाची छोटी लाट येऊ शकते; WHO च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

देशात दर चार ते सहा महिन्यांनी करोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात, असेही स्वामीनाथन म्हणाल्या.

वेब टीम वॊशिंग्टन :  देशात दिवसेंदिवस करोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यात अटोक्यात आलेला हा करोना परत डोके वर काढताना दिसत आहे. या वाढत्या करोनामुळे देशात पुन्हा करोनाच्या छोट्या लाटा येऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

दर चार ते सहा महिन्यांनी करोनाच्या अशा लहान लाटा

देशात नव्या रुपतील करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या नव्या करोनाचे रुप ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आहे. या करोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच दर चार ते सहा महिन्यांनी करोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात असेही स्वामीनाथन म्हणाल्या. त्यामुळे करोनाच्या नियमांचे पालन करण्यासोबतच या नव्या करोनाचा शोध घेणेही महत्वाचे असल्याचे मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.

तसेच घरगुती स्वंयम् चाचणीमुळे करोनाबाधितांची संख्या कमी प्रमाणात नोंदवली जात असल्याची शक्याता डॉ. स्वामीनाथन यांनी व्यक्त केली. यासाठी प्रशासनाला रुग्णाल्यांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही स्वामीनाथन म्हणाल्या. तसेच ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना बुस्टर डोस दिले जातील याची खात्री करणे आवश्यक आहे.

नवा करोना ओमिक्रॉनचे उप-प्रकार

बहुधा हा नवा करोना ओमिक्रॉनचे उप-प्रकार असण्याची शक्यता आहे. लसीकरण केलेल्या किंवा अगोदर करोना झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा नव्या करोनाची लागण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि लसीकरण केले तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

ICMR च्या Covid-19 टास्क फोर्सचे तांत्रिक तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी म्हणाले की, संपूर्ण भारतात ही लाट आहे, असे म्हणणे चूकीचे आहे. कारण वेगवेगळ्या हॉटस्पॉट्समध्ये प्रादेशिक स्पाइक आहेत. या स्पाइक्सचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या चार ते सहा आठवड्यांत करोना रुग्णांमध्ये वाढ झाली होती आणि आता गेल्या दोन दिवसांत घट झाल्याचे दिसून आले आहे.

Post a Comment

0 Comments