बाळ बोठेची रवानगी नाशिकला केल्याप्रकरणी समिती नेमून चौकशीची मागणी

बाळ बोठेची रवानगी नाशिकला केल्याप्रकरणी समिती नेमून चौकशीची मागणी 

वेब टीम नगर : रेखा जरे खून प्रकरणातील मास्टरमाईंड बाळ बोठे याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली . या संदर्भात योग्य ती समिती तयार करून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत चे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना रुणाल जरे व त्यांचे  वकील सचिन पाटेकर  यांनी दिले आहे.  

निवेदनात म्हटले आहे कि,बाळ बोठे  यास अटक झाल्यापासून आज पावेतो इतर आरोपी यांच्यासमवेत पारनेर काराग्रह तालुका पारनेर येथे ठेवण्यात आले होते.  आरोपी बाळ बोठे   हा सराईत गुन्हेगार आहे.  त्याच्याविरुद्ध विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत . तसेच आरोपी याने जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे विविध गुन्ह्यात जामीन अर्ज दाखल केला होता तो नामंजूर केला आहे.  तसेच आरोपी यांनी देखील माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ औरंगाबाद येथे देखील  जामीन न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.  त्यानंतर आरोपी यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली.  पारनेर कारागृहात कैद्याची संख्या खूप वाढली असे वर्तमानपत्रातून समजले.  मुळात आरोपींची रवानगी नाशिक कारागृहात करण्याचे गरजेचे वाटले. 

 माझ्या माहितीनुसार पारनेर कारागृहात गेल्या वर्षभरापासून कैद्यांची संख्या त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.  त्या वेळेस आरोपी बाळ बोठे  यांची रवानगी करण्यात आली . आरोपी पारनेर जेलमधून बाहेर काढण्याचा एक डाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  नाशिक जेलमध्ये आरोपी बाळ बोठे  यांची रवानगी करण्यापूर्वी त्यांची सिविल हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार घेण्यात आले व काही दिवस नगर कारागृहात आरोपीला ठेवण्यात आले असावे अशी देखील शक्यता वाटू लागली आहे.  व लोकांकडून तशी माहिती मिळत आहे. 

 तसेच नगर नाशिक हे साधारण 180 किलोमीटर अंतर आहे.  तसेच नगर पुणे हे 120 किमी आहे . त्यामुळे पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवले उचित राहिले असते असे वाटत नाही का? तसेच आरोपी बाळ मोठे एक वर्षभरापासून पारनेर जेलमध्ये होता ,त्या वेळेस तर कोरोना प्रादुर्भाव जास्त होता.  आताच अशी काही परिस्थिती निर्माण झाली की पारनेर कारागृहात कैद्याची संख्या जास्त वाटू लागली व सदर आरोपी पुणे येथे न नेता नाशिक कारागृहात लांब ठेवण्यात आले.  त्याच्यावर देखील सखोल चौकशी होणे गरजेचे आहे तसेच नाशिक कारागृहातून नगर न्यायालयात आरोपी हजर होणे करता शासनाचा खर्च देखील वाढणार आहे.   इतर गुन्ह्यातील आरोपी यांना पारनेर जेलमध्येच आहे की त्यांना देखील वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आले. त्याची  रवानगी करण्यात आली कि  नाही याचीदेखील समितीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे . बाळ बोठे याची नाशिक कारागृहात केलेली रवानगी संशय निर्माण करणारी आहे.  त्यात काही पोलीस हाताशी धरून ही तयारी केली ही गोष्ट घडवून आणलेली आहे.  या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती मार्फत होणे आवश्यक आहे व गरजेचे आहे.  या संपूर्ण संदर्भात लवकरच कागदपत्रे लागतील त्यानंतर याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.  याबाबत माहिती समोर आल्यानंतर  त्या संदर्भातील जास्तीची माहिती देण्यात येईल. 

 आरोपी क्रमांक नाशिक कारागृहात का करण्यात आली 

यापूर्वी पारनेर जेल मध्ये  कैद्यांची  क्षमते  पेक्षा जास्त  असताना देखील त्या वेळेस आरोपी यांना कुठेही पाठवण्यात आले नाही.  आता ही अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली . जवळचे अंतर सोडून आरोपी यास लांबच्या अंतरावरका ? ठेवण्यात आले . 

 आरोपी कोर्टात अहमदनगर येथे आणणे करिता करण्यासाठी खर्च व वेळ वाया जाणार आहे . यासंदर्भात योग्य ती वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे आवश्यक आहे .

 तसेच यामध्ये समिती स्थापन करून तसा अहवाल अहमदनगर येथील न्यायालयात सादर करावा.  तसेच या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी विनंती रुणाल भाऊसाहेब जरे, सचिन पटेकर यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात केली आहे. 

Post a Comment

0 Comments