शिक्षकांच्या उपोषणाला शिक्षक संघटनांचा पाठिंबा

शिक्षकांच्या उपोषणाला शिक्षक संघटनांचा पाठिंबा

वेब टीम नगर : अभिनव विद्यालय शिरापूर येथील सहशिक्षक शिनारे संतोष व कनिंगध्वज राम या शिक्षकांनी संस्थाचालकांनी चालवलेल्या मानसिक व आर्थिक छळा विरोधात आमरण उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस. या शिक्षकांना जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ,अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, आदी शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे .

 जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे यांनी अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक साठे कैलास यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच आतापर्यंत कपात केलेली रक्कम वसूल करून ती या शिक्षकांना परत करावी आणि कर्जदारांकडूनच कर्जाची वसुली करावी या संपूर्ण प्रकरणात आमच्या सर्व शिक्षक संघटना एकजुटीने या शिक्षकांच्या पाठीशी असून हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे असे ते म्हणाले. 

यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी बाबासाहेब बोडखे ,महेंद्र हिंगे, बाळासाहेब निवडूंगे, बद्रीनाथ शिंदे, भाऊसाहेब जिवडे, दिलीप बोठे, एस. जी.ठाणगे ,झावरे सर, अर्जुन भुजबळ, एस.बी शिंदे, ॲड . नितीन पोळ(कोपरगाव ) आदींनी उपोषणकर्ते संतोष शिनारे आणि राम कनिंगध्वज यांची विचारपूस करून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला .  

Post a Comment

0 Comments