सर्वाधिक कर देऊनही सावेडी उपनगर सुविधांपासून वंचित
वेब टीम नगर : सावेडी उपनगरांचा वाढता विस्तार, दिवसेंदिवस नवीन वसाहतींसह अपार्टमेंट ट्वीन बंगले, व्यावसायिक गाळे,छोटे-मोठे उद्योग व लोकसंख्या वाढली,त्याप्रमाणात मनपाला सावेडीकरांना सर्वात जास्त कर भरुनही स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित रहावे लागते.सावेडी प्रभाग समितीच्या वतीने नगरसेवकांनी मनपाचे उपमहापौर गणेश भोसले यांची भेट घेऊन चर्चा करुन सफाई कामगार वाढवून मिळणेबाबत निवेदनाद्वारे मागणी केली.या निवेदनावर नगरसेवक विनित पाउलबुधे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके,नगरसेविका रुपालीताई वारे, नगरसेविका संध्याताई पवार,नगरसेविका दिपालीताई बारस्कर,नगरसेविका शोभाताई बोरकर आदिंच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात सफाई कामगार उपलब्ध नसल्याने सावेडी परिसरात संपूर्ण भागात स्वच्छता होत नाही. परिणामी मोकळ्या जागांवर, रस्त्यांवर कचरा मोठ्या प्रमाणात साचतो. सावेडी मधील उपनगरातील नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरतात. सर्वात जास्त कर सावेडी विभागामधून प्राप्त होतो.तरीही त्याप्रमाणात सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिक स्वच्छतेबाबत आमच्याकडे तक्रारी करतात. सफाई कामगार कमी असल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब निवेदन देतांना नगरसेवकांनी उपमहापौर गणेश भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके,माजी नगरसेवक निखिल वारे, मा.नगरसेवक बाळासाहेब सामाजिक कार्यकर्ते ळासाहेब बारस्कर, उद्योजक सचिन बारस्कर,मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर उपस्थित होते.सावेडी प्रभाग समितीच्या या निवेदनावर उपमहापौर गणेश भोसले यांनी सकारात्मक चर्चा केली. तातडीने ज्या भागात स्वच्छता होत नाही, सफाई कामगार उपलब्ध नाहीत,त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्न मार्गी लावू,असे आश्वासन नगरसेवकांना दिले.
0 Comments