शेतवस्त्यांवर जबरी चोऱ्या करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

शेतवस्त्यांवर जबरी चोऱ्या करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 

वेब टीम नगर : तालुक्यातील अकोळनेर व बाबुर्डी घुमट हद्दीत शेतवस्तीवर जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. सार्थक सगडया काळे (वय १९, रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा ) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, संदीप घोडके, मनोज गोसावी, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, संदीप चव्हाण, पोकाॅ सागर ससाणे, रविंद्र घुगांसे, रणजीत जाधव, रोहित येमुल व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली  माहिती अशी की, घरात झोपलेले असतांना अज्ञात आरोपीने घराचे छताचे जिन्यातून घरात प्रवेश करीत गळा दाबून ४३ हजार रु. किंमतीचे मंगळसूत्र व मोबाईल फोन बळजबरीने चोरून नेला आहे. या निता अजित पवार ( रा. पवार वस्ती, रेल्वेस्टेशन जवळ, अकोळनेर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०५ / २०२२ भादविक ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथक आरोपींचा शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली सार्थक काळे याने हा गुन्हा केला असून, तो चोरलेले सोन्याचे दागिने सुपा येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे. तात्काळ ही पोनि श्री कटके यांनी पथकाला देत रवाना केले.

एलसीबी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी माहितीप्रमाणे सुरेगांव ते सुपा रोड येथे जाऊन सापळा लावून थांबले, या दरम्यान एकजण रस्त्याने येतांना दिसला पोलीस पथकाची चाहुल लागताच तो शेतामध्ये पळून जावू लागला. पथकाने त्याचा पाठलाग करुन, त्यास शिताफीने पकडले. त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सार्थक सगडया काळे (वय १९, रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा) असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल फोन मिळून आल्याने त्याबाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच सोने हे त्याने त्याचे साथीदारासह अकोळनेर ( ता. नगर) येथे घराचे छताचे जिन्यातून घरात प्रवेश करुन तसेच बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथे शेतातील वस्तीवर चोरी केली आहे.

 अशी हकिगत सांगितली. या घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे अभिलेख पडताळणी असता नगर तालुका पोस्टे गु.र.नं. ३०५/२०२२ भादविक ३९२, ३४ प्रमाणे व नगर तालुका पोस्टे गु.र.नं. ५६३ / २०२९ भादविक ३९४, ३४ प्रमाणे दोन (०२) गुन्हे दाखल असले बाबत माहिती प्राप्त इ आल्याने आरोपीस २३ हजार ५०० रु.किंचे सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोनसह ताब्यात घेऊन नगर तालुका पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे. आरोपीचा फरार साथीदाराचा शोध घेतला परंतु तो मिळून आलेला नाही. त्याचा शोध पोलिस घेत आहोत. पुढील कारवाई नगर तालुका पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments