डिझेल चोरी ,दरोडेखोरांची टोळी जेरबंद

डिझेल चोरी ,दरोडेखोरांची टोळी जेरबंद 

वेब टीम नगर : महामार्गावर रात्रीचे वेळी थांबलेल्या मालवाहतूक ट्रकच्या टाकीतील डिझेल चोरी,तसेच दरोडेखोरांची मध्यप्रदेशातील टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.राजाराम गंगाराम फुलेरीया (वय ३८),धर्मेंद्र शिवनारायण ऊर्फ शिवलाल सोलंकी (वय २७ ),राहुल जुगलकिशोर चंदेल (वय २१ सर्व रा. रामदुपाडा,ता.मोहन वरोदीया, जिल्हा साजापुर, राज्य मध्यप्रदेश),अशोक रामचंदर मालवीय (वय २९), गोविंद पिरुलाल मालवीय (वय ३० दोन्ही रा. सांगवीमाना, ता. जि. साजापुर, राज्य मध्यप्रदेश), अनिकेत राजेश बोरनार (वय २४, रा. उस्थळदुमाला, ता. नेवासा जिल्हा अहमदनगर), असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेले माहिती अशी की,स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथे मागील काही दिवसांपूर्वी ८ गावठी कट्टे पकडले होते. सपोनि. सोमनाथ दिवटे,सफौ. राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, पोहेकॉ. बापुसाहेब फोलाणे,पोना/भिमराज खरसे,पोकाॅ.  रणजीत जाधव व सागर ससाणे आदिंच्या पथकाने गुन्ह्याच्या तपाकसामी दि.२० जून २२ रोजी पहाटे अंदाजे ४ वाचे दरम्यान स्थागुशा पोलीस अधिक्षक कार्यालय अ.नगर येथून मध्यपदेश राज्य येथे जात असतांना वडगांवगुप्ता (ता. नगर) येथे काहीजण ट्रकचेजवळ स्कॉर्पिओ गाडी उभी करुन संशयीतरित्या हालचाली करतांना दिसून आल्या.

 पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खात्री करणे करीता घटनास्थळी थांबताच संशयीत पोलीस पथकाची चाहुल लागताच स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने चालवून मनमाड महामार्गाने राहुरीचे दिशेने पळून जावू लागले. पथकाने ट्रक चालकाकडे चौकशी करता त्याने ट्रकमधील डिझेल चोरी करत असल्याबाबत माहिती दिल्याने त्यांनी तात्काळ पोनि. अनिल कटके यांना फोनव्दारे घटनेची माहिती देवून वाहनाचा पाठलाग सुरु केला.वाहनाचा पाठलास सुरु असतांना पथकाने राहुरी व सोनई पोलिसांशी संपर्क करून घटनाक्रम कळविल्याने राहुरी व सोनई पोलीस ठाणे यांनी लागलीच नाकाबंदीचे आयोजन केले. स्थागुशा पोलीस पथकाचा पाठलाग व राहुरी व सोनई पोलिसांनी केलेली नाकाबंदी यामुळे स्कॉर्पिओतील संशयीत वाहनासह पळून जाता न असल्याने त्यांनी नाइलाजाने ताब्यातील स्कॉर्पिओ वाहन राहुरी शिंगणापुर रोडवर रस्त्याचेकडेला बेवारसपणे सोडून देऊन अंधाराचा फायदा घेत उसाचे शेतामधून पळून गेले. संशयीतांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. संशयीतांनी रस्त्याचे कडेला बेवारस सोडून दिलेले वाहनाची पाहणी करता पथकास वाहनामध्ये प्लास्टीचे डिझेलने भरलेले ड्रम मिळून आले. 

या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे संपर्क करुन घटनेबाबत माहिती देवून पथकास गुन्ह्याचे तपासकामी मध्यप्रदेशकडे रवाना झाले.दरम्यान वरील घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी विनायक विठ्ठल सानप (वय ५१, रा. दत्तनगर, वडगांवगुप्ता शिवार, ता. नगर) हे दि. २० जून २२ रोजी पहाटच्या सुमारास स्टीलने लोड केलेला ट्रेलर रोडच्या कडेला लावून केबिनमध्ये झोपलेले असतांना अज्ञात दोनजण ट्रेलरचे केबिनमध्ये घुसून, लाथाबुक्यांनी मारहाण करुन गळ्याला धारदार शस्त्र लावून जिवे मारण्याची धमकी दिली. केबिनचे खाली उभे असलेले अज्ञात तीन आरोपींनी ट्रेलरचे टाकितील ३९ हजार रु. किंमतीचे ३८० लिटर डिझेल स्कॉर्पिओ मधील प्लास्टीकचे ड्रममध्ये घेऊन निघून गेले आहे.

 घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३५/२२ भादविक ३९५, ५०४ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याची माहिती घेत असतांना पोनि कटके यांना गुन्ह्यातील आरोपी हे चांदा (ता. नेवासा) येथे कैलास दहातोंडे यांच्या वस्तीवर भाडेतत्वावर राहतात, ते त्यांचे सामानाची आवरा आवर करून मध्यप्रदेश राज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली नमुद माहिती पथकास कळवून खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पथकाने बातमीतील ठिकाणी जावून आरोपीचे राहते घराचे आजुबाजून सापळा लावुन थांबलेले असतांना आरोपींना पोलीस पथकाची चाहुल लागताच आरोपी शेतामधून पळून जावू लागले पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा दोन किलोमीटर पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि. सोमनाथ दिवटे,सपोनि. गणेश इंगळे,पोसई. सोपान गोरे,पोहेकॉ.  संदीप घोडके,मनोज गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,पोना. शंकर चौधरी,संदीप दरदंले,रवि सोनटक्के, पोना. ज्ञानेश्वर शिंदे,संदीप चव्हाण,पोकाॅ. मेघराज कोल्हे, शिवाजी ढाकणे,रणजीत जाधव व चापोहेकॉ. उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments