राज ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया
मनसे कार्यकर्त्यांकडून महाआरतीचे आयोजन
वेब टीम मुंबई : जूनच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर हीप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती ही शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आले आहे.
करोनामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली
जूनच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आज लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेपूर्वी काही चाचण्या करणासाठी राज ठाकरेंना काल (शनिवार) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौरा यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजप खासदाराने राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी या भाजप खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.
0 Comments