थकीत पगाराचे धनादेश देऊन, यापुढे पगारातून कपात न करणे या आश्वासना नंतर शिक्षकांचे उपोषण मागे
वेब टीम नगर : संस्थेच्या मानसिक व आर्थिक छळा विरोधात उपोषणास बसलेले शिरापूर येथील अभिनव विद्यालयाचे सहशिक्षक संतोष शिनारे व कनिंगध्वज राम या शिक्षकांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण पाचव्या दिवशी अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षकांचे थकीत पगाराचे धनादेश त्यांच्या खात्यात जमा करावेत व यापुढे पगारातून कोणत्याही प्रकारची कपात करू नये या मुद्द्यावर हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सचिव आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे बाळासाहेब बोडखे , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे महेंद्रा हिंगे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब निवडूंगे, यांच्या सह राजेंद्र वाघ, मच्छिंद्र राऊत, बाळासाहेब दाते आदी मुख्याध्यापक उपस्थित होते.
अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक साठे यांनी सायंकाळी उशिरा थकित पगाराचे धनादेश संतोष शिनारे व कनिंगध्वज राम यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर या दोघांनी उपोषण मागे घेतले .
0 Comments