मोक्का,दरोड्याच्या गुन्हयात फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मोक्का,दरोड्याच्या गुन्हयात फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

वेब टीम नगर: श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडला. चंदु ऊर्फ चंद्रकात भाऊसाहेब घावटे (वय २९, रा. शेळकेवाडी, राजापुर, ता. श्रीगोंदा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थागुशा पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ बबन मखरे, सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकाॅ आकाश काळे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत शेत जमीन असून, या जमिनीमधील चिंचणी धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर जमिनीमध्ये जनावराकरीता चारा पिकवून काही क्षेत्रामधील मातीची विक्री करतात. दरम्यान दि. २८ मे २०२१ रोजी व त्यापूर्वी आरोपी संतोष राधू शिंदे ( रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) याने व त्याचे इतर साथीदारांनी वेळोवेळी दमदाटी करुन, रिव्हॉल्वरचा धाक दाखून शेत जमिनीमधून जेसीबी व पोकलँडचे सहायाने माती बळजबरीने घेऊन गेले होते, या राजाराम चंदर ढवळे ( रा. राजापूर शिवार, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुरनं. २२७ / २०२९ भादविक ३९५ सह आर्म ॲक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे तपासात आरोपीविरुध्द मोक्कान्वय३ (१) (II), ३(२), ३(४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते.

मोक्का व दरोडा गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना स्वतंत्र पथक नेमून फरार आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सूचनाप्रमाणे स्थागुशाचे पथक श्रीगोंदा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी चंद्रकांत घावटे (रा. शेळकेवाडी, राजापुर, ता. श्रीगोंदा) हा त्याच्या वडीलांचे वर्षश्राध्दाचे कार्यक्रमासाठी राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि श्री कटके यांनी मिळालेली माहिती तात्काळ पथकाला दिली.

पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपीचे ठिकाण्याबाबत माहिती घेऊन आरोपीस ताब्यात घेण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे पथकाने आरोपीचे घराचे आजुबाजूस सापळा लावून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याला गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाई करीता बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई बेलवंडी पोलीस करीत आहे.

आरोपी चंदु ऊर्फ चंद्रकात भाऊसाहेब घावटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोक्का, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडा तयारी, जबरीचोरी व गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0 Comments