६५ वर्षांपूर्वी आजोबांच्या काळातील जागा मस्जिदीला विना मोबदला परत
वेब टीम नगर : भाडेकरू व जागा मालक यांची वादावादी सर्वश्रुत आहे जागा मंदिराची असो किंवा मशिदीची जुने भाडेकरूंना जागा खाली करण्यावरून अनेक वेळा वाद होताना दिसतात मात्र नगर शहरात ६५ वर्षापूर्वीच्या आजोबांच्या काळात मशिदीचे भाडेकरू असलेल्या पंचफुला संदिपान गाडे यांच्या ताब्यात असलेली मशिदची जागा मशिदीला विना मोबदला स्वखुषीने पंचफुला संदिपान गाडे यांचे नातू धनराज शशिकुमार गाडे व शुभम जाधव यांनी परत दिली आहे.
न्यायालयात दावा व नावात हिंदू-मुस्लिम ऐक्य जपण्याचा निर्णय घेऊन दोन्ही समाजाचे ऐक्य घडविले आहे.शहराच्या मध्यवर्ती असलेले दो बोटी चिरा मस्जिद व दर्गा ट्रस्ट आहे या मशिदीच्या जागेत आजोबांच्या काळापासून भाडेकरू असलेले धनराज गाडे यांनी मशिदीला जागेची आवश्यकता असताना भाडे पोटी वापरत असलेले १५०० स्केअर फुट ची जागा विनामोबदला स्वखुषीने मस्जिद ट्रस्टला परत दिली. यावेळी गाडे यांचा मस्जिद ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दो बोटी चिरा मस्जिद व दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी आयुब हाशम शेख,मुनाफ बागवान,आबिद हुसेन,पै.उजेर सय्यद,शहनवाज बागवान,आयुब बाबु, मतीन जहागीरदार,अँड.नदीम सय्यद,मजीद सय्यद आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.धनराज गाडे यांचे आजोबा यांनी ६५ वर्षांपूर्वी मशिदीच्या जागेत असलेला व्यवसायिक गाळा व रहाते घर ४० ते ५० रुपये दरमहा भाड्याने घेतला होता.मस्जिदला जागेची आवश्यकता असताना व त्यांचे देखील इतर ठिकाणी स्वतःचे घर होऊन परिस्थिती चांगली झाली असताना त्यांनी मस्जिदला स्वखुषीने सदर जागा कोणताही मोबदला न मागता परत दिली आहे.
गाडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत देऊन एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना दो बोटी चिरा मस्जिद व दर्ग ट्रस्टचे ट्रस्टी यांनी व्यक्त केली. व सदर जागेसाठी अँड.नदीम सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
0 Comments