यशस्वी उद्योजक :
राजेंद्र उदागे यांच्या अथक परिश्रमातून कोहिनूर मंगल कार्यालय,नंदराज केटरर्सची यशस्वी वाटचाल...
व्यवसाय कोणताही असो त्यात येणारी स्थित्यंतरं अंगिकारून व्यवसायात बदल घडवले की यश नक्की मिळते.याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र उदागे यांचे नंदराज केटरर्स.....
नंदराज केटरर्स ने पंचवीस वर्षे पाककला क्षेत्रात आपली अविरत सेवा दिली आहे.सुरुवातीच्या काळात राजेंद्र उदागे स्वतः आणि मदती करता काही मुले असे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप राहिले.त्या काळात जेवणाच्या थाळीत प्रमाणे काम कोणी देत नसायचं. आमच्याकडे लग्न विधीसाठी , मुंजी साठी स्वयंपाक करायचा आहे त्याप्रमाणे बोलवणारे यजमान कच्चा शिधा द्यायचे आणि स्वयंपाकाची करणावळ हाती टेकवायचे.
मात्र २००५ पासून या व्यवसायाचे स्वरूप बदलले.लोक नेटकेपणाने आता सांगू लागले आमच्याकडे अमुक एका कार्यक्रमासाठी ५० थाळ्या हवे आहेत.मग जेवणात काय पदार्थ करायचे तेही सांगू लागले.त्यावर थाळ्यांचे भाव ठरू लागले. मग त्याला लागणारे सर्व साहित्य शिधा ,किराणा ही राजेंद्र उदागे आणीत. स्वयंपाका बरोबरच ताट, वाट्या, फुलपात्र, तांब्या आदी साहित्यही ते पुरवू लागले. अशा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या व्यवसायात राजेंद्र उदागे यांनी जम बसवला. नव्हे त्यात ते रुजले. २००७-०८ नागापूर येथील उद्योजक लिंबाजीशेठ नागरगोजे यांनी मुलीच्या लग्नाचे २० हजार ताटांचे कॉन्ट्रॅक्ट दिले. त्या कामात राजेंद्र उदागे यांनी जेवणात जिभेवर रेंगाळणारी चव असलेले सुग्रास भोजन आणि त्याचबरोबर दिलेली वाढप्यांची उत्तम सेवा. यावर लिंबाजीशेठ एकदम खुश झाले. त्यांनी उदागे यांचे आणि पर्यायाने नंदराज केटरर्सची प्रशंसा केली. त्यातूनच पुढे उदागे यांना काम करण्याची नवी प्रेरणा मिळाली. आपण एवढ्या मोठ्या संख्येच्या भोजनाचे काम करू शकतो याचा विश्वास दुणावला त्यामुळे इतर मोठी कामे ही मिळू लागली.
पाहता पाहता उदागे यांनी कोहिनूर मंगल कार्यालय चालवायला घेतले. त्या मंगल कार्यालयातील प्रत्येक कार्यक्रमाचे व्यवस्थापन ते पाहू लागले. त्यांचे शिक्षण कमी असले तरी प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातूनच मॅनेजमेंटचे धडे त्यांना मिळाले. कार्यक्रम कुठलाही असो आपण फक्त संकल्पना सांगायची आणि राजेंद्र उदागे यांच्या उत्तम व्यवस्थापनाखाली कार्यक्रम यशस्वी होणारच याची खात्री बाळगायची. लग्न म्हटले की बँड, घोडा, हार, डेकोरेशन, जेवण, भटजी आदी गोष्टींचे व्यवस्थापन राजेंद्र उदागे उत्तमरित्या सांभाळतात.त्यांच्या उत्तम सेवा देण्याच्या वृत्तीने गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी या क्षेत्रात चांगलाच नावलौकिक कमावला आहे. सर्व काही एकाच छताखाली या ब्रिदा प्रमाणे कोहिनूर मंगल कार्यालयाची वाटचाल उत्तम रित्या सुरू आहे.
दिवाळीतही कोहिनूर मंगल कार्यालयात नंदराज केटरर्सचा दिवाळी फराळाचा स्टॉल असतो.त्यात लाडू ,करंज्या, चकल्या विविध प्रकारच्या शेव ,चिवडा, शंकरपाळे व अन्य पदार्थ वाजवी दरात मिळतात. या पदार्थांचा अस्सलपणा त्याची चव दीर्घकाळ आठवणीत राहते.
राजेंद्र उदागे यांच्या कामाची दखल घेऊन अहमदनगर केटरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाची माळ २०१७ साली त्यांच्या गळ्यात पडली. याच असोसिएशनच्या जिल्हाभरात शाखा स्थापन करण्यात उदागे यांचा पुढाकार राहिला. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र कॅटरिंग असोसिएशनच्या कार्यकारणीत त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या वाटचालीस नगर टुडे परिवाराच्या शुभेच्छा.
0 Comments