लष्कराची गाडी नदीत पडली ;7 जवान शहीद ; एकूण २६ सैनिक होते

लष्कराची गाडी नदीत पडली ;7 जवान शहीद ; एकूण २६ सैनिक होते

वेब टीम लडाख : लडाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात 7 जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराच्या निवेदनानुसार, २६ सैनिकांची तुकडी परतापूरहून हनीफ सब सेक्टरच्या फॉरवर्ड पोस्टकडे जात होती.

सकाळी 9 च्या सुमारास वाहन घसरून थोईसेपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या श्योक नदीत पडले. जखमी 26 जवानांना तेथून आर्मी फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे 7 जवानांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. लेहहून परतापूरला लष्कराच्या सर्जिकल टीम्स पाठवण्यात आल्या आहेत. गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments