३४ वर्षे जुन्या प्रकरणात एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
वेब टीम चंदीगड/नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला सर्वोच्च न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने ५० हजारांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावत असताना हत्तीवर स्वार होऊन महागाईच्या मुद्द्यावरून पटियालामध्ये सिद्धू आंदोलन करत होते.
या शिक्षेवर नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याच्या गौरवासाठी मी स्वत:ला सादर करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले. या ट्विटवरून सिद्धू न्यायालय किंवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे मानले जात आहे.
सिद्धूवर ३४ वर्षांपूर्वी पटियाला येथे रस्त्याच्या वादातून गुरनाम सिंग यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गुरनाम सिंग यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. रोड रेडचे हे प्रकरण २७ डिसेंबर १९८८ चे आहे. पतियाळा येथे कारमधून जात असताना नवज्योतसिंग सिद्धू गुरनाम सिंग नावाच्या वृद्धावर धावून गेला होता.रागाच्या भरात नवज्योत सिद्धूने त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे, त्यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला. पटियाला पोलिसांनी सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर सिंग यांच्या विरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल केला होता. ट्रायल कोर्टाने 1999 मध्ये पुराव्याअभावी नवज्योतसिंग सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती, परंतु पीडित पक्ष पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचला.
2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धूला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथून त्यांना दिलासा मिळाला आणि सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये एक हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली. यानंतर गुरनाम सिंग यांच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. दहानंतर आज त्याच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
2006 मध्ये जेव्हा उच्च न्यायालयाने सिद्धूला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तेव्हा ते भाजपमध्ये होते आणि अमृतसरमधून खासदार होते. त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागली आणि ते पुन्हा जिंकले.
0 Comments